कुटुंबीयांचा लग्नाला विरोध! प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेमी युगलाने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने या प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे.
अकोला : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेमी युगलाने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने या प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे. अक्षय सुरेश थारकर (वय 32) असं मृत तरुणाचे नाव आहे. तर अक्षदा मोहन शेजोळे( वय 24) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेळद गावातील हे प्रेमी युगल असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय सुरेश थारकर (वय 32) असं मृत तरुणाचे नाव आहे. तर अक्षदा मोहन शेजोळे (वय 24) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, अकोल्यातील कसुरा गावाजवळील रेल्वे ट्रॅकवर दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. याची माहिती मिळताच उरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाकडे रवाना केले आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने या प्रेमी युगलांनी आत्महत्या सारखं टोकाचा निर्णय घेतलाय. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातही धक्कादायक घटना, प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
गडचिरोली (Gadchiroli ) जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर त्याच पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. देवानंद सूर्यभान डोंगरवार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
अपघात वाटावा म्हणून मृतदेह पुलाखाली फेकून बनाव रचला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हत्येनंतर हा प्रकार अपघात वाटावा म्हणून मृतदेह पुलाखाली फेकून बनाव रचला. मात्र पोलीस तपासात हत्येचा उलगडा झाला. देवानंद याने 2018 मध्ये आंधळी येथील रेखाशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र काही काळापूर्वी रेखा राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या प्रेमात पडली. दोन महिन्यांपूर्वी तिने देवानंदचा संसार सोडला आणि ती कुरखेडा येथे विश्वजीतसोबत राहू लागली. देवानंदने तिला वारंवार घरी परतण्याचे आवाहन केले. तंटा मुक्ती समितीनेही मध्यस्थी केली. मात्र रेखाने पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार देत होती.
महत्वाच्या बातम्या:
























