यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत!
आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) सुरु होत आहे.संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे
![यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत! Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan Dr. Jayant Narlikar Will not attend Sammelan यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/66bb1151bb76e1f9acb1641b1b24f14a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan)नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. यासंदर्भात महत्वाचं अपडेट समोर आलं असून नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे की, अध्यक्ष नारळीकर यांना आणण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते येणार नाहीत. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील प्रकृतीच्या कारणामुळं उपस्थित राहू शकणार नाहीत. ते ऑनलाईन हजेरी लावतील अशी माहिती आहे. माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो देखील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असणार आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये संमेलनाचा उत्साह आहे. थंडीच्या वातावरणात देखील साहित्याच्या या मेळ्यात लोकांनी भरभरुन सहभाग घेतला आहे, असं ते म्हणाले. हा उत्साह शेवटच्या दिवसांपर्यंत कायम राहील, असं देखील भुजबळ म्हणाले.
सारस्वतांचा मेळा तीन दिवस
आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासमोर अनेक संकटं कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधी वेगवेगळे वाद मग कोरोनाचं संकट, कोरोनामुळं बदललेल्या तारखा आणि नंतर नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट यामुळं अनेक विघ्नं या संमेलनाच्या वाटेत आली.
94 व्या साहित्य संमेलनादरम्यान पाळावे लागणार 'हे' नियम
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
संमेलनासंबंधी या बातम्याही नक्की वाचा
साहित्य संमेलन पुन्हा वादात! संमेलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच स्थान, भाजपची तीव्र नाराजी
94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)