एक्स्प्लोर
Advertisement
...नाहीतर बायको मला हाकलून देईल : अजित पवार
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शासकीय घराबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या दिलखुलास भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. बारामतीच्या कार्यकर्ता मेळाव्यातही त्यांच्या याच दिलखुलास आणि खुमासदार भाषणाचा प्रत्यय आला. बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत येतात. त्यावेळी आपण नाराज होतो. मुंबईतलं घर लहान आहे. 100 दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय निवासस्थान रिकामं होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचं राहिलं आहे. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको मला हाकलून देईल. अजित पवार असं म्हणाले आणि एकच हशा पिकला.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शासकीय घराबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. अनेकदा बारामतीकर मुंबईत आल्यावर आपण नाराज होत असतो. मुळात आताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरूममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचं राहिलं आहे. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको मला हाकलून देईल. अजित पवार असं म्हणाले आणि एकच हशा पिकला.
Ajit Pawar | ..तर बायको मला घरातून हाकलून देईल : अजित पवार
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटींगवर निवडून येणाऱ्या संचालकाचं जागेवर राजीनामा घेऊ असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी निवडणुकीदरम्यान काहीजण गंमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावं, अन्यथा आपण गंमतीजमती सुरु केल्या तर मदतीलाही कोणी येणार नाही असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
क्रिकेट
पुणे
Advertisement