एक्स्प्लोर

"अजितदादा... जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, बोलायला लागलो तर महागात पडेल"; चंद्रकांत पाटलांचा टोला

तुम्ही महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत स्थापन केलेल्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्रीच. आता माहीत नाही उद्या पुन्हा नवं सरकार स्थापन होईल, त्यातही तुम्हीच उपमुख्यमंत्री असाल, तुम्ही मात्र सगळीकडे पाहिजे. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाची कशाला सांगड नाही. ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार, हे एकच तत्व, असं म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे.

कोल्हापूर : अजितदादा सांभाळून बोला आम्ही फाटकी माणसं आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. तसेच खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी मवाळ भूमिका घेऊ नये, सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवून घ्यावं, असंही चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, "आता मी उभ्या-उभ्या जास्त बोलत नाही, झोपेत सरकार कोणी आणलं? तुम्ही आणलं, शरद पवार साहेबही झोपेतून उठायचे होते. तोपर्यंत तुम्ही शपथविधी करुन मोकळे झालात. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचं, हे तुम्हाला माहीत आहे. मी आपलं उपरोधिकपणे म्हणालो. मला असं वाटत होतं की, अजित पवारांसारखे भरपूर वर्ष राजकारणात असलेले नेते यांना आपण काल काय केलं याची आठवण असेल. पण त्यांना बहुतेक आपण काल काय केलंय याची आठवण नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसांसाठी का होईना सरकार केलं, त्यांच्यावर टीका करताना काहीतरी विचार करा."

"देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलं नव्हतं. विचारपूर्वक केलं ना. तुम्हाला तुमचे 28 आमदार बरोबर आणले ते ठेवता आले नाहीत. सगळे शरद पवारांकडे पळून गेले. त्यानंतर तुम्ही महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत स्थापन केलेल्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्रीच. आता माहीत नाही उद्या पुन्हा नवं सरकार स्थापन होईल, त्यातही तुम्हीच उपमुख्यमंत्री असाल, तुम्ही मात्र सगळीकडे पाहिजे. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाची कशाला सांगड नाही. ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार, हे एकच तत्व. अजितदादा... जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल." 

खासदार संभाजीराजे यांनी सरकारच्या मानगुटीवर बसून मराठा आरक्षण मिळवून घ्यावं : चंद्रकांत पाटील

"मराठा आरक्षण लगेच मिळण्यासाठी, मराठा आरक्षण सवलती सुरु करण्यासाठी, जो-जो संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत, हे आम्ही दहा वेळा सांगितलं आहे. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. पण राजे असं म्हणाले की, आरक्षण मिळालं पाहिजे पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे पण कोविड संपल्यानंतर बघुयात, त्यांची ही भूमिका आम्हाला मान्य नाही. कोविडचा काय संबंध? सगळं जनजीवन सुरु आहे. भ्रष्टाचार सुरु आहे. दोन हातांनी खाणं सुरु आहे. मग काय मराठा समाजानं कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचं का? बाती आम्हाला मान्य आहे.", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

काय म्हणाले होते अजित पवार

काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असं म्हटलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र डागलं होतं. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केलं की झोपेत केलं होतं, असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. तसेच ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणारच, असंही अजित पवारांनी बोलताना ठणकावून सांगितलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

7 Years of Modi Government : मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण; पण देशाचा कारभार काँग्रेसच्याच कामगिरीवर सुरु - संजय राऊत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget