एक्स्प्लोर

निवडून आले अन् सत्तेचा माज सुरू, निवडणुकीआधी पाया पडणारे नेते आता मतदारांचे मालक झाले का?

Maharashtra : राष्ट्रवादीचे अजित पवार असो वा शिवसेनेचे संजय गायकवाड असो किंवा भाजपचे नितेश राणे असो... या सर्वांनीच निवडणूक झाल्यावर मतदारांचे मालक असल्यासारखं वागणं सुरू केलंय. 

मुंबई : सत्तेचा माज काय असतो हे सध्या नेत्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज उरलेली नाही. आधी मतदारांच्या हाता पाया पडणारे आता मतदारांनाच शिव्या घालताना दिसत आहेत. आधी मतदारांसमोर पदर पसरणारे आता मतदारांनाच जाब विचारू लागलेत. 

मतदान केलं म्हणजे मालक झाला का? अजितदादांचा सवाल

लोकसभेप्रमाणे विधानसभेत पराभव वाट्याला येऊ नये म्हणून अजितदादांनी काय नाही केलं? पायाला भिंगरी लावून बारामती पालथी घातली. मतांसाठी बारामतीसमोर पदर पसरला. लोकसभेत ताईला जिंकवलं, आता मला जिंकवा असं म्हणताना कधी दादांचा कंठ दाटला. तर कधी दादांचा रुद्रावतार दिसला.

पण हे होते विधानसभा निवडणुकीआधीचे, उपमुख्यमंत्री होण्याआधीचे अजितदादा. विधानसभा निकालानंतर अजितदादा युरोपची हवा खाऊन आले, जर्मनी फिरून आले. महाराष्ट्रात परतल्यानंतर मतदारांना हिटलरच्या सुरात जाब विचारू लागले. मला मतदान केलं म्हणजे मालक झाला का? अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्याला फैलावर घेतलं. लोकसभेत पत्नीच्या पराभवानंतर काहीसे नरमलेले दादा, विधानसभेतल्या विजयानंतर पुन्हा सुसाट सुटलेत का? असा प्रश्न आता सगळेच विचारू लागलेत.

मतदारांना वेश्याची उपमा 

मतदारांना यूज अँड थ्रोची गोष्ट समजण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी अजितदादांनाही मागे पाडल्याचं दिसतंय. आपण निवडून दिलेला आमदार एवढा शिवराळ आहे, हे समजल्यानंतर काही मतदारांनी देखील मनातल्या मनात भ आणि म चा पाढा सुरू केला असेल. दोन दोन हजारात विकले गेले भाXXX साले, यांच्यापेक्षा रांX बऱ्या अशी मतदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली ती संजय गायकवाडांनी. 

स्वतः लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्या या नेत्यांची, मतदारांना वेश्यांच्या पंक्तीत बसवण्याची हिंमत होतेच कशी? याला सत्तेचा माज नाही तर दुसरं काय म्हणायचं? अजित पवार आणि संजय गायकवाडांचे बोल कानी पडल्यानंतर, विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांनाही तक्रारीचे सूर आळवण्याशिवाय पर्याय उरला नाही.

नितेश राणेंनी मतदारांना थेट दहशतवादी म्हटलं 

राष्ट्रवादीचे अजितदादा, शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या गटात बसणारं आणखी एक नाव म्हणजे भाजपचे नितेश राणे. त्यांनी प्रियंका गांधींना खासदार करणाऱ्या केरळच्या मतदारांना थेट दहशतवादी म्हटलं होतं. 

नेत्यांची जीभ जरी चुरूचुरू चालत असली तरी तिला लगाम घालण्याची ताकद मतदाराच्या एका बोटात आहे हे त्यांनी विसरू नये. सुज्ञास जास्त सांगणे न लगे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Rain News: सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
बीडकरांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक, वडिलांची आठवण; खासदार सोनवणेंच्या बॅनरवरुनही टोला
बीडकरांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक, वडिलांची आठवण; खासदार सोनवणेंच्या बॅनरवरुनही टोला
Pune Budhwar Peth: 'पैसा नही तो इधर कायकु आया', तरुण पुण्यातील बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला; तीन महिलांनी त्याला....
'पैसा नही तो इधर कायकु आया', तरुण पुण्यातील बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला; तीन महिलांनी त्याला....
बीडात रेल्वे आली रेss  ट्रेन बघायला, सेल्फी अन् रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी; व्यासपीठावर नेतेमंडळींची टोलेबाजी
बीडात रेल्वे आली रेss ट्रेन बघायला, सेल्फी अन् रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी; व्यासपीठावर नेतेमंडळींची टोलेबाजी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Rain News: सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
बीडकरांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक, वडिलांची आठवण; खासदार सोनवणेंच्या बॅनरवरुनही टोला
बीडकरांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक, वडिलांची आठवण; खासदार सोनवणेंच्या बॅनरवरुनही टोला
Pune Budhwar Peth: 'पैसा नही तो इधर कायकु आया', तरुण पुण्यातील बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला; तीन महिलांनी त्याला....
'पैसा नही तो इधर कायकु आया', तरुण पुण्यातील बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला; तीन महिलांनी त्याला....
बीडात रेल्वे आली रेss  ट्रेन बघायला, सेल्फी अन् रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी; व्यासपीठावर नेतेमंडळींची टोलेबाजी
बीडात रेल्वे आली रेss ट्रेन बघायला, सेल्फी अन् रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी; व्यासपीठावर नेतेमंडळींची टोलेबाजी
अशी ही बनवाबनवी चित्रपटातील 'सुधा'चे Gemini ट्रेंडमधील फोटो पाहून प्रेमातच पडाल
अशी ही बनवाबनवी चित्रपटातील 'सुधा'चे Gemini ट्रेंडमधील फोटो पाहून प्रेमातच पडाल
Dhananjay Munde & Bajrang Sonawane: बीडच्या रेल्वेने बजरंग बाप्पा आणि धनंजय मुंडेंना जवळ आणलं, दोघांची 'सीट' आजूबाजूला, घडाघडा बोलूही लागले!
बीडच्या रेल्वेने बजरंग बाप्पा आणि धनंजय मुंडेंना जवळ आणलं, दोघांची 'सीट' आजूबाजूला, घडाघडा बोलूही लागले!
Dhananjay Munde: 4 मार्चला राजीनामा,  धनंजय मुंडे 30 सप्टेंबरपर्यंत सातपुडा बंगला सोडणार? छगन भुजबळ अद्याप वेटिंगवर
4 मार्चला राजीनामा, धनंजय मुंडे 30 सप्टेंबरपर्यंत सातपुडा बंगला सोडणार? छगन भुजबळ अद्याप वेटिंगवर
Gopichand Padalkar & Sharad Pawar: शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना: गोपीचंद पडळकर
शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना: गोपीचंद पडळकर
Embed widget