एक्स्प्लोर

Gopichand Padalkar & Sharad Pawar: शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना: गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar & Sharad Pawar: जयंत पाटलांनी आत्महत्या केली तर मला एक नंबरचा आरोपी करा, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली.

Gopichand Padalkar & Sharad Pawar: शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे, हे शरद पवारांकडे (Sharad Pawar) पाहून शिकता येईल. मारकडवाडी प्रकरणात त्यांनी देशाच्या निवडणूक आयोगावर (Election Commission) शंका निर्माण करण्याचे काम केले. ज्या शरद पवारांनी दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावले, त्यांच्यावर निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून गुन्हा निर्माण केला पाहिजे. निवडणूक हा देशाचा गाभा आहे, त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह आहे. त्यामुळे शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

शरद पवार हा आधुनिक काळातील नारदमुनी आहे. एकीकडे मंडल यात्रा, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून नातू आंदोलन करतो. ही भूमिका दुतोंडी आहे. तुम्ही षडयंत्र करून एखादा यंत्रणेबाबत साशंकता निर्माण करता. चिठ्ठ्या गिळता येतात, पळवता येतात. त्यामुळे सहकार क्षेत्रात शरद पवार यांचे प्राबल्य आहे. सहकारात जर ईव्हीएम आले तर यांचे प्राबल्य संपून जाईल. निवडणूक हा देशाचा गाभा आहे, त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.

शरद पवार यांनी स्वत: सांगितले की, त्यांच्याकडे दोन लोक आले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत 160 आमदार निवडून आणण्याची ऑफर दिली. त्यांनी तात्काळ गृहमंत्र्यांना फोन करून सांगितले पाहिजे होते. पण शरद पवार यांनी हा प्लॅन राहुल गांधी यांना सांगितला. निवडणूक झाल्यावर आठ महिन्यांनी त्यांनी ही गोष्ट त्यांनी सांगितली. तुम्ही पोलिसांऐवजी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेला म्हणजे हे षडयंत्र आहे ना, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच आता ते लोक कोण होते, हे आठवत नाही, असे शरद पवार सांगतात. शरद पवारांना 50 वर्षांपूर्वी भेटलेले लोक आणि गोष्टी आठवतात. मग आठ महिन्यांपूर्वी भेटायला आलेले दोन लोक त्यांना आठवत नाहीत का, असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

Gopichand Padalkar on Meenatai Thackeray statue: मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला, पडळकर म्हणाले...

मुंबईच्या दादर परिसरात असणाऱ्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला. यावरुन दादर परिसरात तणाव निर्माण झाला, शिवसैनिक आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, माँ साहेब आमच्या श्रद्धास्थानी आहेत. त्यांच्या पुतळ्यावर रंग फेकणे, योग्य नाही. पोलीस याप्रकरणात योग्य ती कारवाई करतील, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

सुरेश कलमाडींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; भेटीसाठी शरद पवार रुग्णालयात पोहचले, पवारांना पाहताच कलमाडी म्हणाले...

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget