एक्स्प्लोर

जिल्हाधिकाऱ्यांना सालगडी समजता का? : अजित पवार

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केल्याची माहिती, अजित पवार यांनी दिली. पुणे महानगरापालिकेनं बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकरांवर अप्रत्यक्ष तोफ डागली. जिल्हाधिकाऱ्यांना सालगडी समजता का? सत्ताधारी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना सालगडी समजतात का, असा सवाल अजित पवारांनी केला. भगवानगडातल्या भाषणाला आडकाठी केल्याचा आरोप करत नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची १२ तासात बदली करा, असं विधान महादेव जानकर यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांना सल्ला अजित पवार म्हणाले, "येत्या 31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्र्यांनी सांगेन की, त्यांनी मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा. काही मंत्री म्हणतात की बारा तासात जिल्ह्याधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे. जिल्ह्याधिकारी म्हणजे काय सालगडी आहेत का?" मराठा आरक्षण मराठा आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत सरकार फक्त ठराव करतंय, बाकी काही नाही. बारामतीमधे काल दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. असे प्रकार वाढत आहेत, कारण पोलीस आणि कायद्याची भिती राहिलेली नाही. लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहे ते त्यामुळेच. कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने फाशी द्या" अशी मागणी अजित पवारांनी केली. पाण्याच्या टाक्यांवर भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई पुण्यात पाण्याच्या टाक्यांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीत आज श्रेयवाद रंगला. वानवडी भागात पुणे महानगरापालिकेनं बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. मात्र, या कामात राज्य सरकारचाही वाटा असल्यानं मुख्यमंत्र्यांना आमंत्रण हवं होतं, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला.. आणि या कार्यक्रमाआधी काळी काळ आंदोलनही केलं. अजित पवारांचा विरोधकांना चिमटा दरम्यान जनतेच्या हिताच्या उपक्रमांमध्ये श्रेयवादाचं राजकारण करु नका, असं आवाहन करत अजित पवारांनी महापालिकेतल्या विरोधकांना चिमटाही काढला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: डेमो न घेताच, मतदान प्रक्रिया का राबवली? छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅलेट पेपरवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आक्षेप
Maharashtra Live blog updates: डेमो न घेताच, मतदान प्रक्रिया का राबवली? छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅलेट पेपरवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आक्षेप
Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरने चिरडलं, एकाचा मृत्यू, 6 जखमी; धाराशिवमध्ये भीषण अपघात!
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरने चिरडलं, एकाचा मृत्यू, 6 जखमी; धाराशिवमध्ये भीषण अपघात!
Vijay Wadettiwar: ऑडिओ क्लिप पुढे आणल्याबद्दल जरांगे पाटलांचे मनापासून अभिनंदन; वस्तुस्थिती अन् सत्य उघड झालंच पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
ऑडिओ क्लिप पुढे आणल्याबद्दल जरांगे पाटलांचे मनापासून अभिनंदन; वस्तुस्थिती अन् सत्य उघड झालंच पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Amit Shah: तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Embed widget