आम्ही शिकलो असतो तर एका इंजिनिअरला काम करु दिल नसतं, अजित पवारांचा अधिकाऱ्यांना टोला
सोमेश्वर नगर येथे उभारण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या आरोग्य पथकाच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. सोमेश्वर नगर येथे उभारण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या आरोग्य पथकाच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी इमारतीचे ड्रॉइंग प्लॅनची उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत होते. यावेळी अजित पवरांनी त्या ठिकाणी इथे पार्किंगला गाड्या उभ्या राहतील. इथे इमर्जेन्सी एन्ट्री होईल. अंडर वॉटर टॅक इथे नका घेऊ. तो चढावर घ्या. म्हणजे पाणी ग्रॅविटीन जाईल.आम्ही शिकलो असतो तर एकाही इंजिनियरला काम करु दिलं नसतं अस उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणाले.
ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार
जी चढाची बाजू असेल तिकडे वॉटर टॅक घ्या.असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांना हसू आवरले नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अखत्यारितीतील या आधुनिक हॉस्पिटलसाठी योग्य तो निधी मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 10 एकर गायरान क्षेत्रात ही सुविधा उभारली जाणार आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
फडणवीस सरकारचे 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांसह मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठी महत्वाचे निर्णय
























