एक्स्प्लोर

Amol Mitkari: रिकाम्या ट्रोलर्सना काही कामधंदा राहिला नाही, चुकीच्या धनादेशावरून ट्रोल करणाऱ्यांना अमोल मिटकरींनी सुनावलं; म्हणाले..

Amol Mitkari: जितेंद्र आव्हाडांसाठी लिहिलेल्या चुकीच्या धनादेशावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना आमदार अमोल मिटकरी यांना खडे बोल सुनावले आहे. 

Akola News अकोलाराष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar) नव्या तुतारी चिन्हाचं लोकार्पण करण्यात आलं. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावरच्या सदरेवर हा सोहळा संपन्न झाला. मात्र, या तुतारीवरुन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. आमदार मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना थेट चॅलेंज देत, त्यांनी तुतारी वाजवून दाखवावी आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस घेऊन जावं, असे मिटकरी म्हणाले होते. मिटकरींनी दिलेले चॅलेंज आव्हाडांना स्वीकारले आणि ते चॅलेंज पूर्ण देखील केले. मात्र त्यातही मिटकरींनी चूक दाखवली आणि ही चूक दाखवताना ते स्वत:च चुकले असल्याचे समोर आले.

जितेंद्र आव्हाडांसाठी लिहिलेल्या धनादेशावर मिटकरी यांनी चेकवरील नावाच्या रकाण्यात नाव, तर नावाच्या रकाण्यात रक्कम लिहिल्याची चूक घडली होती. यावरून ट्रोलर्सनी अमोल मिटकरी यांना चांगलेच ट्रोल केल्याचे बघायला मिळाले. यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी अशा ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहे. सोबतच त्यांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

मी आव्हांडासारखे रोज चेक घेत नाही - अमोल मिटकरी

यावेळी ते म्हणाले,  मी गरीब कुटुंबातील माणूस आहे. मला चेक लिहण्याची फार सवय नाही. शिवाय आपण आव्हांडासारखे रोज चेक घेत नसल्याने आपल्याला ती सवय नाही.आता रिकाम्या ट्रोलर्सना काही कामधंदा राहिलेला नसल्याचे देखील मिटकरी म्हणालेय. पुढे बोलतांना ते म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना दिलेले चॅलेंज त्यांनी पूर्ण केलेले नाही. ते फक्त तुतारी वाजविण्याचं नाटक करत होते. तुतारी वाजवितांना पोट आतमध्ये जात असतं, मात्र आव्हाडांचे पोट बाहेर होतं. तो आवाज आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तुतारीचा नसून मागच्या तुतारी वादकांचा असल्याचे म्हणत अमोल मिटकरी यांनी हा दावा फेटाळून लावत परत एक नवे आव्हान दिले आहे.  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 तारखेपासून मुंबईत विधान भवनात पार पडत आहे. त्यांनी पहिल्या दिवशी स्वतः तुतारी आणावी. पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांकडून, ज्याला अजित पवार यांनी 50 हजार रुपये महिन्यावर ठेवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा", असं अमोल मिटकरी यांनी परत जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले आहे.

जेवढं तुमचे आयुष्य, तेवढा पवार साहेबांचा राजकीय अनुभव

दरम्यान, तुतारी चिन्हावरून शरद पवारांवर अश्लाघ्य शब्दात टीका करणाऱ्या सदाभाऊ खोतांनाही मिटकरींनी सुनावलंय. खोतांनी तोंडाला आवर घालावा, असा सल्ला त्यांनी दिलाय.  सदाभाऊ खोतांनी केलेलं वक्तव्य माणुसकीला शोभणारे नाही. पवार साहेब हे देशाचे आणि राज्याचे फार मोठे नेते आहेत. जरी साहेबांसोबत आज आम्ही नाही, पण साहेब आमच्या हृदयात आजही आहे. तुमचे आयुष्य जेवढं आहे तेवढा  पवार साहेबांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे बोलतांना जरा मर्यादा राखली पाहिजेल, असा सल्ला देखील अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget