एक्स्प्लोर

Amol Mitkari : बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा, अन्यथा..,अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल!

Amol Mitkari : महाडमध्ये 'मनुस्मृती'चं दहन करताना डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याचा आरोप करत आमदार अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Amol Mitkari On Jitendra Awhad : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार,'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील  (Manusmriti) काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. मात्र, यावरुन आता राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. मनुस्मृतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत वादंग सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही या निर्णयाला टोकाचा विरोध केला आहे.

त्यांनी आज (29 मे) थेट रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावरून राज्याचे राजकारण नव्यानं तापले असून आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार टीका करत थेट जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

राज्यभरात तीव्र आंदोलन इशारा

महाडमध्ये 'मनुस्मृती'चं दहन करतांना स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केलीये. यासंदर्भात आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आमदार अमोल  मिटकरींनी केलीये. यासंदर्भात आव्हाडांनी महाड येथेच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासुन माफी मागितली पाहिजे, असे न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आमदार अमोल मिटकरींनी दिलाय. 

राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा- जितेंद्र आव्हाड

महाड येथील आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फडले ही फार मोठी चूक आहे. जितेंद्र आव्हाडांनी स्टंटबाजी करत असताना इतकी ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये कि, आपण पोस्टर फाडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर पडत आहोत. ही चूक अक्षम्य आहे. याची गंभीर दखल देशानेही घेतली आहे. या घटनेचा प्रथम मी निषेध करतो आणि ज्या जितेंद्र आव्हाड यांनी हे कृत्य करून राष्ट्राचा अवमान केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा  गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केलीय. 

अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी

पुढे बोलताना ते म्हणाले की, 24 तासांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली नाही किंवा महाडच्या डॉ. बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून प्रायश्चित्त घेतले नाही, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे. कारण हा अपमान कुण्या एका समाजाचा नसून  संपूर्ण देशाचा अपमान आहे. स्टंटबाजीच्या नादात  राष्ट्रद्रोह करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. असा थेट इशाराही आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : चवदार तळ्यात ओंजळीने पाणी प्यायले, महाडमध्ये जाऊन मनुस्मृती जाळली, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget