राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजलं, अजित पवार-देवेंद्र फडणवीस आमनेसामने
Maharashtra Assembly Session : अजित पवार म्हणाले, आता सरकार सहकारी साखर कारखान्यांना हमी देत नाही. जो-तो स्वतःच्या ताकदीवर कारखाना चालवत आहे.
Maharashtra Assembly Session : राज्यात सहकारी साखर कारखाना विक्री मध्ये झालेला गैररव्यवहारप्रकरणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली, दरम्यान राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा (25,000 crore scam in co-operative sugar factories) झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे (anna hazare) यांनी केला होता. तसंच, अण्णा हजारे यांनी गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांना पत्र लिहून चौकशीची मागणी देखील केली होती. यावर हे गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजलं असून अजित पवार-देवेंद्र फडणवीस आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं
सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभेत खडाजंगी
राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अण्णा हजारे यांनी 25 जानेवारी 2022 रोजी जी मागणी केली. त्याचे पत्र आमच्याकडे आले नाही, त्यावर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस म्हणाले, अण्णा हजारेंना खोटं ठरवू नका, उत्तर सुधारा अण्णा हजारे यांनी पत्र लिहले हे सर्वांना माहीत आहे आणि हे सरकारला माहीत नाही म्हणून सरकार झोपलं आहे का? असा सवाल फडणवीसांनी विधानसभेत केला. पाटील म्हणाले, अण्णा हजारे यांनी हे प्रश्न वारंवार उपस्थित केले आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णा हजारे यांची तक्रार बाजूला ठेवली. मुळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत हे कारखाने विकले आहेत. यांची चौकशी होणार का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. त्यावर पाटील म्हणाले, आॅक्शन प्राईज ठरली, त्याप्रमाणे ही विक्री झाली आहे
मला नवल वाटतं की एकदा अण्णा हजारे यांना भेटावं
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे कारखाने विकले आहेत, त्याच्या जमिनीची किंमत जास्त आहे. जे कारखाने विकले त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांच कर्ज घेतले आहे. याचा अर्थ त्यांची किंमत जास्त आहे. अण्णा हजारे यांचा हाच आक्षेप आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली. गरज नसतांना यावर गैरसमज करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णा हजारे आणि राजू शेट्टी यांनी तुमच्याकडे आणि राज्यपाल आणि इतर ठिकाणी तक्रार केली. त्यानंतर तुम्ही चौकशीचे आदेश दिले होते. यात एसीबी, सीआयडी आणि माजी न्यायाधीश यांच्या अंतर्गत चौकशी झाली. देवेंद्र फडणवीस साहेब यात तुमचा गैरसमज झाला आहे. इथे अनेकजण कारखाने चालवत आहेत. ज्याला कारखाने चालवायचा असेल त्यांनी जा आणि कारखाने चालवा. आम्ही सोमेश्वर कारखाना चालवायला घेतला, आम्हाला तिथे 10 कोटी रुपये पहिल्या वर्षी तोटा झाला. ब-याच सदस्यांना याची माहिती नसते. भ्रष्टाचार झाला असा गैरसमज होतो. अनेक कारखान्यांची कोर्टाच्या निर्णयानंतर विक्री झाली आहे. मला नवल वाटतं की एकदा अण्णा हजारे यांना भेटावं आणि काय काय चौकशी झाली याची माहिती घ्यावी. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णा हजारे यांच्या पत्राची दखल घेतली पाहिजे. किसनवीर कारखाना अडचणीत आला कारण मदन दादा आमच्याकडं आले. त्यांना कर्ज देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 5 कारखान्यांना हमी दिली. त्यानंतर एका ही कारखान्याला हमी देणार नाही अस सांगण्यात आलं. त्यानंतर एकाही कारखान्याला हमी दिली नाही. यावर पाटील म्हणाले, मी अण्णा हजारे यांना भेटून एसआयटी आणि जाधव कमिटीच्या अहवालाची माहिती देणार आहे
आता सरकार सहकारी साखर कारखान्यांना हमी देत नाही
राज्यातील थकबाकीदार कारखान्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आता सरकार सहकारी साखर कारखान्यांना हमी देत नाही. जो-तो स्वतःच्या ताकदीवर कारखाना चालवत आहे. अनेक बँका कर्ज दिल्यामुळे आतापर्यंत अडचणीत आल्या होत्या. मात्र, सध्या राज्य सहकारी बँकेचा नफा 380 कोटींवर गेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या नफ्यात फडणीस सरकारचेही योगदान आहे, हे सांगायला अजित पवार विसरले नाहीत. फडणवीस यांनी काही चांगली माणसे नेमली. त्याचा फायदा होताना दिसतोय, याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut on BJP : गोवा जिंकलं म्हणून स्वागत झालं, ढोल वाजवले, पण... : संजय राऊत
HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक