एक्स्प्लोर

शिवसैनिकांची हत्या : राष्ट्रवादीच्या बदनामीचं षडयंत्र : अजित पवार

दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी (7 एप्रिल) अटक झाली आहे.

अहमदनगर : "अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार साताऱ्यात बोलत होते. दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी (7 एप्रिल) अटक झाली आहे. तर त्यांचे वडील अरुण जगताप यांच्याविरोधात हत्येच्या कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र या आरोपांमधून राष्ट्रवादीची बदनामी सुरु असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ते म्हणाले की, "या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण आहे तो शोधून काढा, ती जबाबादारी पोलिसांची आहे. फोन तपासा, कुठे सुई जाते ते तपासा. या सगळ्या तपासात संग्रामचा कुठेही यत्किंचितही संबंध नाही, हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अशाप्रकारचा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीचा आमदार म्हणून बदनामी करण्याचं काम चाललेलं आहे. संशयाच्या भोवऱ्यामध्ये त्यांना अडकवण्याचं काम सुरु आहे." काय आहे प्रकरण? बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं. रक्तरंजित पोटनिवडणूक अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला. या पोटनिवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकरचा चुलत भाऊ विशाल कोतकर हा कॉँग्रेसकडून विजयी झाला. त्यानं शिवसेनेच्या विजय पटारेचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वीपासून शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये राजकीय वाद झाला होता. त्याचबरोबर शाब्दिक चकमकही उडाली होती. त्यामुळे याचंच पर्यवसान हत्यांमध्ये झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांना शनिवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर रविवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील आमदार अरुण जगताप  यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेनं रविवारी अहमदनगर बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यांवर कडकडीत बंद पाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. अहमदनगर शहरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत दोन्ही शिवसैनिकांच्या पार्थिवाचे अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचं शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी सांगितलं. कोणत्या पक्षाचा कोण आमदार, कोण कोणाचा नातेवाईक? संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर त्यांचे वडील अरुण जगताप राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे आमदार आहेत. कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम यांची पत्नी आहे, तर कर्डिलेंची दुसरी कन्या सुवर्णा या माजी उपमहापौर असून माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत. कोतकर यांची कन्या आमदार अरुण जगताप यांची सून आहे. राजकारण अबाधित ठेवण्यासाठी हाडवैर असलेल्या तिघांनी सोयरीक केली, मात्र राजकारणमुळे अशोक लांडे हत्येनंतर पुन्हा हे संकटात सापडले आहेत. लांडे हत्या प्रकरणी कर्डिले यांनीही तुरुंगवास भोगला आहे. एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बातम्या शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत नगरमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून संगनमताने हत्या : रामदास कदम 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget