एक्स्प्लोर
अहमदनगर महापालिका निवडणूक अर्ज छाननीत भाजपला धक्का
याशिवाय महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम यांच्या अर्जावरील हरकती फेटाळून ते अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी आणि सून दीप्ती गांधी यांच्यासह पक्षाच्या चार नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. याशिवाय शिवेसेना एक, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक आणि अपक्ष एक, अशा एकूण सात उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
भाजपच्या सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे या चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर शिवसेनेचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार योगेश चिपाडे, अपक्ष उमेदवार सय्यद सादीक आरिफ यांचाही अर्ज बाद झालेल्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम यांच्या अर्जावरील हरकती फेटाळून ते अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक अर्ज बाद झाला असला तरी सुवेंद्र आणि दीप्ती गांधी यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजप, विशेषत: खासदार दिलीप गांधी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अहमदनगर महापालिकेच्या 68 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी चार पथके नियुक्त करण्यात आली असून पोलिस अधिकारी, दंडाधिकारी व मनपा अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement