एक्स्प्लोर
कोपर्डीतील पीडित मुलीचा पुतळा काढणार
कोपर्डीतील पीडित मुलीचा पुतळा काढण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. कोपर्डीत पीडित मुलीच्या पुतळ्यावरुन वाद निर्माण झाला होता.
अहमदनगर : कोपर्डीतील पीडित मुलीचा पुतळा काढण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. कोपर्डीत पीडित मुलीच्या पुतळ्यावरुन वाद निर्माण झाला होता. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पीडितेच्या कुटंबीयांनी हा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला 13 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झालं. यावेळी कोपर्डीतल्या पीडितेच्या घरासमोर तिचं स्मारक बांधण्यात आलं.
भय्यूजी महाराज यांचा सूर्योदय परिवार आणि पीडितेच्या कुटुंबाकडून या स्मारकाची उभारणी करण्यात आली. राज्यभरातून हजारो नागरिक यावेळी कोपर्डीत उपस्थित होते.
पीडितेच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडने जाहीर विरोध केला होता. त्यामुळे वर्षश्राद्धानंतर रात्री पीडितेचा कुटुंबीयांच्या उपस्थितीत पुतळा बसवण्यात आला होता. त्यावरुन पुन्हा वादविवाद सुरु झाल्याने पुतळा झाकून ठेवण्यात आला होता.
यानंतर संभाजी ब्रिगेडने सन्मानपूर्वक पुतळा काढण्याची मागणी केली होती. शिवाय अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती.
या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पीडितेच्या पालकांनी पुतळा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुतळा आणि समाधीवरुन आरोप प्रत्यारोप टाळण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
संबंधित बातम्या
कोपर्डीतील पीडितेचं स्मारक नाही, समाधी, आईचा बांध फुटला
कोपर्डी बलात्कार आणि हत्येला एक वर्ष पूर्ण
कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव!
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement