सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मानाच्या वारकऱ्याचा मान; शासकीय महापूजा संपन्न, पंढरीत वैष्णवांचा मेळा
Pandharpur News : मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या साटाणामधील बाळू अहिरे यांना महापूजा करण्याचा मान मिळाला.
Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा (Vitthal Rukmini Mahapooja) करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. यंदा आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आषाढी एकाशीच शासकीय महापूजा (Ashadhi Ekadashi Shasakiya Mahapooja) नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील अहिरे कुटुंबानं केली. नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब 16 वर्ष नित्यनियमानं पंढरीची वारी (Pandharpur Vari) करतंय. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.
नाशकातील सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मिळाला मानाच्या वारकऱ्याचा मान मिळाला. तर आई वडिलांच्या पुण्यामुळेच विठुरायाच्या पूजेचा मान मिळाल्याची प्रतिक्रिया अहिरे दाम्पत्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
आषाढीच्या शासकीय महापुजेसाठी मानाचे वारकरी ठरलेल्या अहिरे कुटुंबाशी एबीपी माझानं बातचित केली आहे. एबीपी माझाशी बोलताना अहिरे म्हणाले की, "माझ्या आई-वडिलांची पुण्याई म्हणूनच पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला. कित्येक तास रांगेत उभा होता, त्यानंतर आम्हाला मान मिळाला. आम्हाला मान मिळणं हे आमचं भाग्यच समजतो आम्ही. गेल्या 16 वर्षांपासून नित्यनियमानं आम्ही वारी करतोय."
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, असं विठुरायाचरणी साकडं घातलं.
पाहा व्हिडीओ : Eknath Shinde Pandharpur Puja:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याहस्ते विठ्ठल-रुक्मिणीमातेची महापूजा संपन्न