यशोगाथा: बारामतीच्या युवा शेतकऱ्याची कमाल! 2 एकर टोमॅटोतून 17 लाखांचे उत्पन्न अजून 6 लाखांचं उत्पन्न अपेक्षित
Agriculture News : बारामतीतल्या सस्तेवाडी गावच्या गणेश कदम यांनी दोन एकरात 17 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. अर्थात रोगामुळे त्याचा टोमॅटो उत्पादन खर्च देखील वाढला आहे.
टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे शेतकरी देखील त्रस्त झालेत. कारण टोमॅटोवर आलेल्या रोगामुळे.. गेल्या 2 वर्षांपासून टोमॅटोवर ऍलो मॅजिक रोग आल्याने अनेकांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत.. परंतु अशातच बारामती तालुक्यातील सस्तेवाडीतील गणेश कदम यांनी आपली बाग फुलवली आहे. आणि त्यांना चांगला दर देखील मिळतो आहे..
यंदा टोमॅटोवर रोगामुळे अनेकांचे उभे प्लॉट उध्वस्त झाले आहेत. दर वर्षी सस्तेवाडी भागात 200 ते 300 एकर टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र केवळ 10 ते 20 एकरावर टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. रोगामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले आहे.
गणेश कदम यांनी 2 एकरावर टोमॅटोची लागवड केली.. त्यातून त्यांना 10 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु गणेश कदम यांना आतापर्यंत 17 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. अजून एक महिना कदम यांचे टोमॅटो सुरू राहील. त्यातून त्यांना अजून 5 ते 6 लाख उत्पन्न अपेक्षित आहे. जसं उत्पादन जास्त मिळते आहे. त्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे.
टोमॅटोचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला जशी कात्री बसते आहे. त्याच प्रमाणे टोमॅटो पिकावर आलेल्या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या