Agriculture News : साहेब विम्याचे पैसे मिळाले, आता दिवळी साजरी करा; कृषीमंत्री मुंडेंना शेतकऱ्याची भावनिक साद
एका शेतकऱ्यानं कृषीमंत्री धनंजय मंत्री मुंडेंना भावनिक पत्र लिहलं आहे. 'साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा' अशी भावनिक साद शेतकऱ्याने घातली आहे.
Agriculture News : दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांना दीवाळीपूर्वी पीक विम्याची मदत मिळवून दिली नाही, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही,अशी प्रतिज्ञा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. मात्र, त्यानंतर आता शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत आहेत. याच पार्श्वभूमवर एका शेतकऱ्यानं मंत्री मुंडेंना भावनिक पत्र लिहलं आहे. 'साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा' अशी भावनिक साद शेतकऱ्याने घातली आहे. या शेतकऱ्याने दिवाळीची भेट वस्तू देऊन भावनिक पत्र लिहले आहे.
यावर्षी राज्य सरकारनं एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करुन त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पावसाने 21 दिवसापेक्षा जास्त खंड दिल्यामुळं या पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, अनेक पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चाल ढकल, अपील केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊपर्यंत सार्वजनिक सभा आणि समारंभात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पगुच्छ, हार सुद्धा स्वीकारले नाहीत.दरम्यान 26 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता थेट खात्यात वर्ग करण्यात आला. तसेच 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याचे मान्य करून रक्कम खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये वर्ग होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन सणा-सुदीच्या दिवसात थोडासा आधार मिळाला असल्याचे मुंडे म्हणाले.
गोविंद देशमुख असं शेतकऱ्याचे नाव
एका शेतकऱ्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना एक भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. या पत्रासोबत त्यांनी दिवाळीची भेट वस्तू देऊन धनंजय मुंडे यांना आता आपणही दिवाळी साजरी करा अशी साद घातली. गोविंद देशमुख असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. यावर्षी कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे दुष्काळामुळे शेतकरी होरपळला. परंतू, राज्याच्या कृषीमंत्रीपदावर आपण विराजमान असल्यानं प्रत्येक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला.
आपण शब्द पाळला, खरा करुन दाखवला
प्रधानमंत्री पीकवीमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर मीसुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेव्हाच आम्हाला वाटले की आमच्या घरातीलच कोणी कृषी मंत्रीपदावर विराजमान आहे.
आपण शब्द पाळला, खरा करुन दाखवला असे शेतकऱ्याने म्हटले आहे. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये वितरीत झाले आहेत. बीड जिल्ह्यात 7 लाख शेतकऱ्यांना 241 कोटी रुपये मिळणार आहेत, त्याबद्दलही मुंडे यांचे अभिनंदन केले आहे. आम्हाला खात्री आहे की,आपल्या पदाचा आपण असाच फायदा गोरगरीबांना मिळवून द्याल असे मुंडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: