एक्स्प्लोर

Manpada Police Station : विनयभंगाचा आरोप असलेल्या आरोपीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू

आरोपीला फिट आल्याने मानपाडा पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय वारके असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Manpada Police Station : डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात एका आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला फिट आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दत्तात्रय वारके असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. एका महिलेच्या छेडछाड प्रकरणी दत्तात्रय वारके याला अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत मानपाडा पोलीस ठाण्याच्या आयसोलेशन रूममध्ये होता.  

दत्तात्रय वारके याच्याविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 5 फेब्रुवारीला एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दत्तात्रय हा एका बिल्डरकडे कामाला होता. 2013 साली त्याने घर विकत देण्यासाठी  एका महिलेकडून पाच लाख रुपये घेतले होते. मात्र, या महिलेला तो घरही देत नव्हता आणि पैसे पण परत करत नव्हता. यासंदर्भात महिलेने वारंवार दत्तात्रयकडे तगादा लावला होता. मात्र, दत्तात्रय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दत्तात्रयने  फोनवर महिलेसोबत अश्लिल वर्तन केले. याबाबत सदर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

यासंदर्भात महिलेने मानव अधिकारसह इतर ठिकाणी सुद्धा तक्रारी दिल्या होत्या. मानपाडा पोलीस ठाण्यात दत्तात्रय विरोधात महिलेकडून करण्यात आलेल्या तक्रारीवर पोलिसांनी 26 फेब्रुवारीला जळगावहून आरोपीला अटक केली होती. कल्याण कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या आधी कोव्हिड रिपोर्ट बंधनकारक आहे. त्यासाठी मानपाडा पोलिसांनी दत्तात्रयला पोलीस स्टेशनच्या आयसोलेशन रूममध्ये ठेवले होते. त्याची कोवीड चाचणी केली होती. पोलीस रिपोर्टच्या प्रतीक्षेत होते मात्र, आज पहाटे त्याला फीट आल्याने तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारा दरम्यान दत्तात्रयचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दत्तात्रयचे कुटुंब भुसावळमध्ये राहते. दुर्दैवी बाब म्हणजे कालच त्याच्या भावाचा अपघात झाला आहे. फीट आल्याने दत्तात्रयचा मृत्यू झाल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, डॉकटरांच्या पॅनलखाली त्याचे शवविच्छेदन होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaRanveer Allahbadia Statment | रणबीर अलाहबादियाचा आधी विकृत कारनामा, मग माफीनामा Special ReportSomnath Suryawanshi Case |  सुरेश धस यांचा दुटप्पीपणा, विरोधकांचा हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Embed widget