(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abu Azmi : काही लोकांकडून मुंबईतील शांतता बिघडवली जातेय; अबू आझमींचा आरोप, मुख्यमंत्र्याकडे कारवाईची मागणी
रमजानच्या महिन्यात मुद्दाम 'जय श्री राम'चा नारा देणारे डीजे लावण्यात येत आहेत. काही लोक मुंबईतील शांतता बिघडवत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलाय.
Abu Azmi : काही लोक मुंबईतील शांतता बिघडवत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. रमजानच्या महिन्यात मुद्दाम 'जय श्री राम'चा नारा देणारे डीजे लावण्यात येत आहेत. लोकांना भडकवण्यासाठी मुस्लिम लोकसंख्या कमी असलेल्या भागात मशिदींसमोर नारे दिले जात असल्याचे आझमी म्हणाले. याप्रकरणी अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
समाजकंटकांकडून मुंबई शहरातील शांततापूर्ण वातावरण बिघडवले जात असल्याचे अबू आझमी यांनी म्हटले आहे. रमजानच्या महिन्यात मुद्दाम मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात मशिदींसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या जात आहेत. जेणेकरुन लोक संतप्त होऊन आपापसात भांडतील. या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी आहे.
दरम्यान, रविवारी ही घटना मालाडच्या मानखुर्द पीएमजी कॉलनीच्या मालोनी भागात घडली. गाड्या फोडल्या, तलवारी काढल्या, लोकांचे नुकसान झाले. मुंबई पोलिसांना या सर्व घटनांची पूर्ण माहिती आहे. मुंबई शहर आणि राज्यातील शांतता बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी समजून घेऊन कठोर कारवाई करावी असे आझमी म्हणाले. काही लोक राजकीय फायद्यासाठी असा प्रकारचे कृत्य करत असल्याचे अबू आझमी म्हणाले. हिंदू आणि मुस्लीम आपापसात लढतील असे समाजकंटकाकडून काम सुरु आहे. ज्या ठिकाणी मुस्लीम लोक राहताात त्या ठिकाणी असे कृत्य करुन शांतता का बिघडवली जात आहे, असा सवालही अबू आझमी यांनी केला आहे.
मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत आधीही बोललो होतो. परंतु, ते अद्यापही सुरूच आहे. प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, भोंगे काढावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागले. अन्यथा आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचवू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी असे वक्तव्य केले होते. मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरील मुद्दा उपस्थित केल्यानंतर यावर राजकीय वर्तळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Abu Azmi Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक करून बेड्या ठोका, अबू आझमी यांची मागणी
- आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही; मनसे आमदार राजू पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर