एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 एप्रिल 2019 | शुक्रवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरे, नितीश कुमार, प्रकाशसिंह बादलांसह एनडीएचे प्रमुख नेते उपस्थित http://bit.ly/2vmpOfV
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अडीच कोटींची मालमत्ता, अचल संपत्तीमध्ये गांधीनगरमधील एका सदनिकेत 25 टक्के मालकी, तर हातातील रोकड फक्त 38 हजार रुपये http://bit.ly/2UIfcCm
- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाचे पुन्हा संकेत, सुजय वडिलांना भाजपमध्ये आणायचं म्हणतोय, मुख्यमंत्र्यांच्या सभेत मंत्री राम शिंदेंचं वक्तव्य http://bit.ly/2W8nsgr
- शिवसेना उमेदवार राजन विचारेंना विरोध करणाऱ्या ठाण्यातील गावात पाचशे पोलिस सशस्त्र घुसले, सरकार पोलिस बळाचा गैरवापर करत असल्याचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप http://bit.ly/2VkM2xB
- भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्यवर आग, लेफ्टनंट कमांडर डी एस चौहान यांचा मृत्यू, आग आटोक्यात http://bit.ly/2IPoXft
- बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी, सुरत सत्र न्यायालयाचा निकाल, 30 एप्रिलला शिक्षेची सुनावणी http://bit.ly/2W6Qfln
- घोटाळेबाज बँका आणि मोठ्या कर्जदारांची माहिती रिझर्व्ह बँक लपवू शकत नाही, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई, सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयला सुनावले http://bit.ly/2L2AcEc
- पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला दुहेरी दणका, लंडन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, तर मोदी आणि चोक्सीच्या मालकीच्या गाड्यांचा लिलाव http://bit.ly/2IIN2Wn
- मारुती सुझुकी पुढील वर्षापासून डिझेल कारची निर्मिती आणि विक्री बंद करणार, प्रदूषणविषयक कठोर नियमावलीच्या पालनासाठी निर्णय http://bit.ly/2DyIM7m
- जगभरात 'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'ची तुफान क्रेझ, पहिल्याच दिवशी बाराशे कोटींचा गल्ला जमवणारा एकमेव सिनेमा, मध्यरात्रीही सिनेमा हाऊसफुल्ल http://bit.ly/2DLeLld
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
Advertisement