एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- पूरग्रस्तांसाठी शरद पवार खासदारांसह पंतप्रधानांना भेटणार, मराठवाड्यात शेतकऱ्यांशी संवाद https://bit.ly/3m1HbLp तर जबाबदारी केंद्राची, मग तुम्ही काय करणार? चंद्रकांत पाटलांचा टोला https://bit.ly/3lZdjiI
- शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा! खासदार संभाजीराजे म्हणतात.. तात्काळ मदत जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली असेल तर तो त्यांचा अधिकार https://bit.ly/35dF9Rm
- शेती नुकसानीबाबत नुसते दौरे नको, शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख राजू शेट्टी यांची राज्य आणि केंद्राकडे मागणी https://bit.ly/37p7Ihk
- कुठल्याच सरकारकडून कर्जमाफी नाही! शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंसह लावलेल्या फ्लेक्सची चर्चा https://bit.ly/3lYUnQW
- आजपासून मोनो रेल्वे सेवेला सुरुवात, उद्यापासून धावणाऱ्या मुंबई मेट्रोची आज ट्रायल रन, मात्र, सर्वसामान्यांना लोकल प्रवासाच्या परवानगीची प्रतीक्षा https://bit.ly/359bQzl
- राज्यपालांनी काही शब्द टाळायला हवे होते, बंद मंदिरांवरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धाडलेल्या पत्रावर अमित शाहांची प्रतिक्रिया, संजय राऊतांकडून शाहांच्या विधानाचं स्वागत https://bit.ly/35dCyH4
- कोरोनाची लस येईपर्यंत मास्क घालणं गरजेचं, रत्नागिरीतील प्लाझ्मा थेरपी अफेरेसिस युनिटच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/2T6U8XU
- फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात येणार, सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीचा दावा https://bit.ly/3o1ta1Z
- ऑनलाईन शॉपिंग सेलचा व्यापाऱ्यांना फटका! लॉकडाऊननंतर सुरु केलेल्या व्यवसायाचा वेग मंदावण्याची शक्यता https://bit.ly/3jaQbf6
- आयपीएल 2020 स्पर्धेत आज विजयाच्या शोधात असलेले कोलकाता-हैदराबाद आमने-सामने.. गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये येण्यासाठी संघर्ष https://bit.ly/3dGoZUr
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement