(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2021 | बुधवार*
1. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाचा एसईबीसी कायदा रद्द, राज्यातील मराठा समाज मागास नसल्याचं मत, आरक्षणाला असलेली 50 टक्क्यांची घटनादत्त मर्यादा ओलांडण्यासाठी कोणतंही सशक्त कारण गायकवाड आयोगाच्या शिफारसीत नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/3ekbOe3 निकालानंतर काही ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक https://bit.ly/2Rvjz7C
2. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी मात्र उद्रेक न करण्याचं खासदार संभाजीराजे छत्रपतींचं समाजाला आवाहन, राज्य आणि केंद्र सरकारांनी पुरेपूर प्रयत्न केल्याचाही विश्वास https://bit.ly/3eSjxyV मुख्यमंत्री ठाकरे मराठा आरक्षणाविरोधात असल्याचा भाजप नेते खासदार नारायण राणे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा थांबणार नसल्याचा निर्धार https://bit.ly/3nQDn1m
3. मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी, केंद्र सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी https://bit.ly/3vGYsOH लढा संपलेला नाही, मराठा आरक्षणासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आवाहन https://bit.ly/3to4wtM
4. मराठा आरक्षणाचं श्रेय भाजपला मिळू नये म्हणून कोर्टात आरक्षणाचा मुडदा पाडल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असल्याचाही गौप्यस्फोट https://bit.ly/3ePVW1M सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीनं करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन https://bit.ly/2Rst5bX
5. आरक्षण रद्द झालं तरी या कायद्यानुसार झालेले 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले पीजी मेडिकल अभ्यासक्रमांचे प्रवेश अबाधित, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट निर्देश https://bit.ly/3tjR6iB
6. 'हत्या झाली तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील', कोर्टाच्या निर्णयाचं मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंकडून स्वागत https://bit.ly/2QYTCNU
गरीब मराठा समाजावर अन्याय; संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया https://bit.ly/3xGSCyy
7. कोल्हापुरातील कडक लॉकडाऊनचा निर्णय काही तासात मागे, लॉकडाऊनऐवजी जनता कर्फ्यू पाळण्याचं प्रशासनाचं आवाहन https://bit.ly/3nQQGyR बारामतीत सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात https://bit.ly/33iNWRI
8. ममता बॅनर्जींनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, शपथविधीनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना निर्बंधांवर शिक्कामोर्तब
https://bit.ly/3eSohVj
9. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींचा निधी
https://bit.ly/3nPHWcp
10. कोरोनाने संपवली 'चळवळ'! अकोल्यातील प्रा. मुकुंद खैरेचं कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त https://bit.ly/3vGeqIS
*ABP माझा स्पेशल :*
Maratha Reservation : इतर राज्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळली गेली आहे का? https://bit.ly/3xRbr2m
Kerala Vaccination : देशासाठी आदर्श ठरणारा कोरोना लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न' https://bit.ly/3vLMOls
COVID-19 Third Wave : कोरोनाची तिसरी लाट लहानग्यांसाठी धोकादायक? https://bit.ly/3ula0H9
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv