ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2024 | गुरुवार
1. मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा, अजित पवारांची दिल्लीत घोषणा, राष्ट्रवादी-शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार याकडे लक्ष https://tinyurl.com/2a9dus9p अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभा लढवण्याची घोषणा, लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणार असल्याचाही निर्धार https://tinyurl.com/448pyk8a
2. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची शक्यता, पक्षातील नेत्यांकडून मनधरणी, काळजीवाहू मुख्यमंत्र्याचा सकारात्मक प्रतिसाद असल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/ttvnj6ke शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा, राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल, तर सेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता https://tinyurl.com/mrhs2vy3
3. सत्तास्थापनेसंदर्भातील बैठकीसाठी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस दिल्लीत, ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता, मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली https://tinyurl.com/3wmzk3ws देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर वर्दळ अन् लगबग वाढली, नवनीत राणा, धनंजय मुंडे, भरत गोगावले, जयकुमार रावल, सुधीर मुनगंटीवार, आशिष देशमुखांसह अनेकजण भेटीला https://tinyurl.com/3fspuayx
4. एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान https://tinyurl.com/5b77uk7z
5. दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं https://tinyurl.com/bdfa6uhr पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा बच्चू कडूंचा दावा, बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन जिंकून दाखवा, राणा दाम्पत्यास चॅलेंज https://tinyurl.com/mrxhcsyv
6. निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं https://tinyurl.com/3jap6dhd दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात https://tinyurl.com/bdh4jr78
7. नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; अकोल्यातील राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत अनेक बोगस विद्यार्थ्यांचा भरणा, चौकशीही मागणी https://tinyurl.com/3p57yxht
8. एअर इंडियाच्या महिला पायलटची मुंबईत आत्महत्या, नॉन व्हेज खाल्ल्यामुळं बॉयफ्रेंडने केला छळ, त्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://tinyurl.com/88b4v6nn
9. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप https://tinyurl.com/4yvfstzw
10. शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 1190 अंकांनी कोसळला, निफ्टीतही 360 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान https://tinyurl.com/5d95aa7u
एबीपी माझा स्पेशल
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं? https://tinyurl.com/bdcp77se