ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2025 | मंगळवार
1.राज्यात 15 हजार पोलीस भरती, रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय https://tinyurl.com/3s359vts महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार पदभरती नेमकी कशी, कोणत्या पोस्टच्या किती जागा, भरती प्रकिया नेमकी कशी? https://tinyurl.com/379jwy2j
2. महायुतीच्या नेत्यांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी, राधाकृष्ण विखे-पाटलांचं अजित पवारांवर तोंडसुख, इथेनॉल धोरण लागू करणाऱ्या मोदी-शाहांचा फोटो न बॅनरवर न लावल्यानं संताप https://tinyurl.com/5t4858e4 आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय बरं का; अमोल मिटकरींचा विखे पाटलांवर पलटवार https://tinyurl.com/bdhw7ppx
3. सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन योजनेचा पुरता बोजवारा, हजारो कोटींची थकबाकी देण्यास केंद्र आणि राज्याची टोलवाटोलवी, कंत्राटदारांच्या तोंडचं पाणी पळालं https://tinyurl.com/5ezzf957
4. ठाकरे बंधू एकत्र आले तरी आमची काहीच हरकत नाही, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं महत्त्वाचं वक्तव्य https://tinyurl.com/2nx9hxn9
5. पत्नीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीला संपवलं, गोरेगाव फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या भरत अहिरेला अमानुषपणे मारहाण, 12 वर्षांच्या मुलीच्या जबाबातून घटना उघड https://tinyurl.com/4w9py4r8 भिवंडीत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला धारदार शस्त्राने वार करुन संपवलं https://tinyurl.com/52kzx6am
6. गावावरुन परतली, वडिलांना फोनही केला अन् पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला, शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील मुलीची आत्महत्या https://tinyurl.com/3ntzuf43 'आई, मी गेल्यावर रडू नकोस'; गर्लफ्रेंडने लग्नाला नकार देताच बॉयफ्रेंडनं उचललं टोकाचं पाऊल, जळगावच्या तरुणाचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/3tunu39a
7. गुहागर तालुक्यातील ब्राह्मण समाज पाताळयंत्री, भास्कर जाधवांची टीका, पक्षाऐवजी समाजातर्फे का पत्र दिलं? जाधवांचा सवाल, माफी मागण्याचा प्रश्न नसल्याचं वक्तव्य https://tinyurl.com/2mtkxken
8. अलहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांना मोठा दणका, महाभियोग प्रस्तावाला लोकसभेची मंजुरी, घरात रोकड सापडल्यानं अडचणीत वाढ https://tinyurl.com/4uczm5bt
9. वेगळ्या बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह माजिद ब्रिगेड या दहशतवादी संघटना म्हणून घोषित, अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेचे मोठे गिफ्ट https://tinyurl.com/99vp6x9f
10. आशिया चषकासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता, सिराज, जैस्वाल, राहुल संघाबाहेर राहण्याची चिन्हं, तर गिल, संजू, बुमराहसह इतरांना संधी मिळण्याचे संकेत https://tinyurl.com/3mzvy4cc बीसीसीआयने अचानक 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला बंगळुरुला बोलावून घेतलं, स्पेशल ट्रेनिंगला सुरुवात https://tinyurl.com/4ja83wuv
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























