एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 डिसेंबर 2018 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 डिसेंबर 2018 | बुधवार*
- भीमा-कोरेगाव येथील वादग्रस्त 'विजयस्तंभ' जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश https://goo.gl/vPyC7X
- राज्यातील सर्व प्रकारची दस्त नोंदणी ठप्प, सर्व्हर डाऊन झाल्याने दस्त नोंदणीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय https://goo.gl/tEXNMG
- ठाण्यात घोडबंदर रोडवरील बनावट बटर कंपनीवर पोलिसांची धाड, अमूल बटरच्या नावाखाली काळाधंदा, एक हजार किलो बटर जप्त https://goo.gl/LQ5BYi
- उद्या संध्याकाळी 7 ते 10 वेळेत देशभरातील केबल सेवा बंद राहणार, ट्राय विरोधात केबल संघटनांचा आक्रमक पवित्रा, नव्या नियमांविरोधात एल्गार https://goo.gl/HpnsMN
- उद्धव ठाकरेंचं भान हरपलं, पंढरपुरातल्या भाषणात ठाकरेंच्या तोंडी राहुल गांधींची भाषा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीका, कुंभकर्ण उपमेचाही समाचार https://goo.gl/7y4rjC
- जागावाटपाची बोलणी होईपर्यंत उद्धव ठाकरे किंवा 'सामना'तून कितीही टीका झाली तरी त्या विरोधात बोलू नका, संयम बाळगा, भाजप पक्षश्रेष्ठींचे आदेश https://goo.gl/81t4io
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार हे सांगणं कठीण, योगगुरु रामदेव बाबांचं वक्तव्य, तर आगामी निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचा पुनरुच्चार https://goo.gl/eAiw9A
- कवडीमोल भावामुळे येवल्यात शेतकऱ्याने 70 क्विंटल कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला, तर परभणीत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले https://goo.gl/THWxSR
- बहुप्रतीक्षित ठाकरे सिनेमाचा हिंदी आणि मराठी दोन्ही ट्रेलर लॉन्च, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनपटावरील चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार https://goo.gl/46fekC , सिनेमातील काही दृश्य आणि संवादावर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप https://goo.gl/4Mnohq
- मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या दोन बाद 215 धावा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकं https://goo.gl/13mNRZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement