स्मार्ट बुलेटिन | 04 जानेवारी 2021 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सरकारला दोनशे तर खासगी वापराला एक हजार रुपयांत लस, अदर पुनावाला यांची एबीपी माझाला मुलाखत, कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा
2. न परवडणाऱ्यांना सरकार मोफत लस देणार, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानि सल्लागार, के राघवन यांची एबीपी माझाला माहिती, 10 ते 15 दिवसात लसीकरण सुरु करणार
3. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आज अतिमहत्त्वाची बैठक, एमएसपी आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
4. आजपासून पुणे, नाशिक, औरंगाबादमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरु, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबद्दल पालकांचा संमिश्र प्रतिसाद, अनेकांकडून अद्याप संमती पत्र नाही
5. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन, साताऱ्यात वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास
6. थंडीने गारठलेल्या मुंबई आणि उपनगरात पावसाचा शिडकावा, 6 आणि 7 जानेवारीला कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी बरसण्याचा
7. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या गायब झालेल्या पाकिटाची चर्चा, पाकीट हरवलं, चोरीला गेलं की गहाळ झालं, याबाबत अस्पष्टता
8. आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला पोलिसांनी वाचवलं, वाशीतील इमारतीच्या छतावरील थरार, पोलिकांकडून तरुणीची तासभर समजूत
9. अर्जुन पुरस्कार विजेता पैलवान राहुल आवारे लग्नाच्या बेडीत, प्रशिक्षक काका पवार यांची कन्या ऐर्श्वयासोबत विवाहबद्ध; शरद पवार, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती
10. डोंबिवलीकरासाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन विशेष ठरणार, 26 जानेवारीला संकल्पतीर्थ परिसरात 150 फूट उंचीचा तिरंगा फडकणार