(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 ऑगस्ट 2021 | सोमवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस, उद्या 11 वाजता हजर राहण्याचे आदेश, चौकशीला कायदेशीर मार्गानं सामोरं जाणार परबांती प्रतिक्रिया
2. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचिट नाहीच, सीबीआयचं स्पष्टीकरण, व्हायरल अहवालावर मात्र नो कमेंट्स
3. केंद्रानं रात्रीच्या संचारबंदीबाबत केलेल्या सूचनांची राज्यसरकार अंमलबजावणी करेल, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
4. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपचं आंदोलन; मुंबई, पुणे, पंढरपूर आणि शिर्डीत साधू-महंतांसह भाजपची आंदोलनाची तयारी
5. आज कोकण, विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मध्यमाहाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज; मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin: स्मार्ट बुलेटिन : 30 ऑगस्ट : सोमवार : ABP Majha
6. कोरोना प्रादुर्भावामुळं दहीहंडी साधेपणानं साजरी करण्याचं सरकारचं आवाहन, मनसे आणि भाजप मात्र दहीहंडी साजरी करण्यावर ठाम
7. कोरोना लसीचे दोन डोस घेतले नसल्यास आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, गणपतीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रशासनाची नवी नियमावली
8. अफगाणिस्तानात काबूल विमानतळानजिक रॉकेट हल्ला, 4 बॉम्बरवर अमेरिकेकडून एअर स्ट्राईक केल्याचा अल-जजिरा वृत्तसंस्थेचा दावा
9. गोकुळअष्टमी आणि श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरं सजली, भाविकांना प्रवेशबंदी, तर पंढरीत विठुरायाच्या गाभाऱ्यात आरास
10. पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताच्या अवनी लेखाराला सुवर्णपदक; थाळीफेकमध्ये योगेश कठुनिया, भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरियानं रौप्यपदक, तर भालाफेकमध्ये सुंदर गुजरियाला कांस्यपदक