Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जून 2021 | बुधवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जून 2021 | बुधवार | ABP Majha abp majha smart bulletin 2nd June 2021 Wednesday top 10 headlines Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जून 2021 | बुधवार | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/02/51686babccabe0d5d97de064561b83a4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा पंतप्रधानांचा मोठा निर्णय, महाराष्ट्रासह अनेक राज्यातही बारावीची परीक्षा रद्द होण्याची शक्यता
2. ओबीसी वर्गासाठी स्वतंत्र मागासवर्गीय आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं राजकीय आरक्षणाला धक्का लागल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
3. कोरोना उपचारांसाठी अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांच्या मनमानीला चाप, तर आकारणीसाठी शहरांची वर्गवारी, ग्रामीण भागांत स्वस्त उपचार देण्याचा प्रयत्न
4. लसीकरणाच्या तुटवड्याबाबत शरद पवार अदर पुनावालांशी बोलणार, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
5. कोरोना रुग्णांच्या उपचारांच्या जबाबदारीतून मुक्त करा, नाशकातील 172 रुग्णालयांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जून 2021 | बुधवार | ABP Majha
6. एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर लिक्विडनं शेतकऱ्यांचं काम होणार, IFFCO कंपनीकडून नॅनो युरियाची निर्मिती, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
7. तासंतास चालणाऱ्या ऑनलाईन क्लाससंबंधी पंतप्रधानांकडे तक्रार करणाऱ्या काश्मिरी चिमुकलीची मागणी मान्य, ऑनलाईन क्लासचा कालावधी कमी करण्याचे प्रशासनाचे आदेश
8. ग्लोबल टेंडरमधून मुंबईला लसपुरवठ्याबाबत अनिश्चितता; पुरवठादारांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास महापालिकेला टेंडर गुंडाळावे लागणार
9. तोक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी सरकारने केलेली आर्थिक मदत हास्यास्पद, मच्छिमारांची टीका; 15 जूनला आंदोलनाचा इशारा
10. कर्जबुडव्या मेहुल चोक्सीला डोमेनिकाच्या न्यायालयात हजर करणार, चोक्सीला भारताकडे सोपवणार की, पुन्हा अँटिगामध्ये रवानगी होणार याकडे लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)