Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 2 ऑगस्ट 2021 | सोमवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. काल दिवसभरात 12 जिल्हे आणि 12 महापालिका क्षेत्रात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही, मात्र धोका टळला नसल्यानं खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
2. पंचवीस जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्याची नुसतीच घोषणा, अद्याप अंमलबजावणी नाही, पुणे व्यापारी संघाचा सरकारला बुधवारपर्यंत अल्टिमेटम
3. मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर, पलूस, अंकलखोप, कसबे डिग्रज, आयर्विन पूल परिसरात पुरामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार
4. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचं पाचव्यांदा समन्स, आज अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
5. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, राज्यातील पूरग्रस्त भागात 26 ठिकाणी भेटी दिल्यानंतर 26 मागण्या
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 ऑगस्ट 2021 | सोमवार | ABP Majha
6. नागपुरात 17 वर्षीय गतीमंद मुलीवर एकाच रात्रीत दोन वेळा सामुहिक बलात्कार, चार जणांना अटक
7. जीएसटीच्या स्वरुपात केंद्र सरकारच्या तिजोरीत 1 लाख 16 हजार कोटी जमा, केंद्र सरकारच्या संकलनात 33 तर महाराष्ट्र सरकारच्या संकलनात 51 टक्क्यांची वाढ
8. दुर्मिळ आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकल्या वेदिकेची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू, लेकीला वाचवण्यासाठी माता-पित्यानं लोकसहभागातून जमवले होते 16 कोटी रुपये
9. महाडच्या 14 वर्षीय धावपटू साक्षी दाभेकरला मदतीची गरज, दरड कोसळल्यावर चिमुरड्याला वाचवताना पाय गमावला, क्रिडापटू होण्याचं स्वप्न भंगलं
10. स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनची टोकियोत ऑलिम्पिक कांस्य पदकाची कमाई, भारतीय हॉकी संघ 41 वर्षांनी टोकीयो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत