(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 29 जानेवारी 2022 : शनिवार : ABP Majha
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
१. मुंबईत मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना पालिकेकडून 21 दिवसांची मुदत, थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त होणार, मार्च अखेरपर्यंत सुमारे दीड हजार कोटी वसुलीचे उद्दिष्ट
२. सुपरमार्केटमध्ये वाईनविक्रीचा निर्णय आणि नाईट लाईफच्या संकल्पनेवरुन संभाजी भिडेंची आगपाखड, तर लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या निर्णयावरुन चक्क न्यायमूर्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
३. एन. डी. पाटलांच्या निधनानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोलकरांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा अविनाश पाटलांचा आरोप
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे पडलेली फुट अधिकच मोठी होताना दिसतेय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करतोय तर दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत काम करतोय. नुकतेच एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वाद पुन्हा उफाळून आलाय. एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने घेतला. मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतलाय. येत्या जून महिन्यात संस्थेच्या कार्यकारिणीत याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं अविनाश पाटील यांनी पत्रक काढून म्हटलंय. त्याचबरोबर हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबीयांवर घराणेशाहीचा आरोपही त्यांनी केलाय. यावर अद्याप हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही गट आपलाच गट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असल्याचा दावा करत आहेत.
४. तूर्तास मास्कमुक्त महाराष्ट्राचा गैरसमज डोक्यातून काढून टाका, कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कच मोठं हत्यार असल्याचं आदित्य ठाकरेंचं मत
५. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घ्या, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची सूचना, परीक्षेआधी लसीकरण पूर्ण करण्याचीही विनंती
६. देशातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर या दोन जिल्ह्यांचा समावेश
७. भाजप सर्वात श्रीमंत पक्ष; बसपा दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी, प्रादेशिक पक्षांमध्ये सपा अव्वलस्थानी
८. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर होणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता
९. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये सिंध नदीत नौका बुडाली, 12 पैकी 10 जणांना वाचवण्यात यश, दोन लहान मुलांचा शोध सुरु
१०. बेस्टच्या ताब्यात लवकरच नव्या रुपातल्या 900 डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बसेस येणार, मुंबईकरांचा प्रवास गारेगार आणि आणखी सुकर होणार