एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 29 मार्च 2022 : मंगळवार : ABP Majha

देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

1. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर, नाणार रिफायनरिबाबत काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष

2. वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर, कालची बैठक तोडग्याविना तर संप मागे न घेतल्यानं ऊर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठकही रद्द

3. गेल्या आठ दिवसात सातव्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 74 पैशांनी महागलं

Petrol Diesel Price Today 29 March : भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कडाडलं आहे. आज पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचलं आहे. 

गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागलं आहे.

4. निधीवाटपावरुन शिवसेनेची खदखद कायम, अडीच वर्षात पक्षाचा प्रचंड अपमान, शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचं वक्तव्य

5. जोतिबाची यात्रा यंदा पूर्ण क्षमतेनं, यात्रेवर कोणतेही निर्बंध नसणार, पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 29  मार्च 2022 : मंगळवार

6. राज्यभरातील दारू विक्रेत्यांना सरकारचा मोठा दिलासा, वाढीव परवाना शुल्क दर शासनाने केले कमी

7. डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, एमआयडीसीतील नाल्यातून चक्क निळं पाणी, नागरिकांना त्रास

8. पाकिस्तानात इम्रान खान सरकारची अग्निपरीक्षा, सरकारविरोधात अविश्वास ठराव सादर, 31 मार्चला होणार फैसला

Pakistan Imran Khan : मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास मत प्रस्ताव दाखल केला आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये आज सायंकाळी अविश्वास मत प्रस्तावावर चर्चा सुरू होणार आहे. या प्रस्तावावर आजच मतदान होण्याची शक्यता आहे.  इम्रान खान यांचे सरकार कोसळणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास मताच्या ठरावाला सामोरे जाण्याआधी रविवारी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. परेड ग्राउंडमध्ये झालेल्या सभेत इम्रान खान यांनी सरकारने केलेल्या कामांची यादी मांडत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तानचे सरकार पाडण्यासाठी परदेशी शक्तींचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही खान यांनी केला. आपण कोणत्याही परिस्थिती राजीनामा देणार नसल्याची गर्जना इम्रान यांनी यावेळी केली. 

9. छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'होम मिनिस्टर'नं पूर्ण केला 18 वर्षांचा टप्पा, कार्यक्रमाचं नाव बदलून 'महामिनिस्टर' होणार 

Maha Minister : छोट्या पडद्यावरील 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाने आता अठरा वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर घराघरांत पोहोचले आहे. आता लवकरच होम मिनिस्टरचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव 'महामिनिस्टर' (Maha Minister) असं असणार आहे. 

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्रातील वहिनींचे लाडके भावजी ठरले आहेत. आता आदेश बांदेकर 'महामिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महापर्वाची विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील वहिनींना 11 लाखांची पैठणी जिंकता येणार आहे. 

10. रॉयल चँलेंजर्स बेंगलोरपासून वेगळं होण्यावर युजवेंद्र चहलचा खुलासा, रिटेन न केल्यानं व्यक्त केली खंत'

IPL 2022 : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बेंगलोरपासून (RCB - आरसीबी) वेगळं होण्यावर खुलासा केला आहे.  31 वर्षीय युजवेंद्र चहल म्हणाला की, ‘आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने रिटेन करण्यासाठी मला विचारलेही नाही. रिटेन करण्याचा कोणताही प्रस्ताव आरसीबीकडून आला नाही.’ आयपीएल 15 मध्ये दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे स्पर्धा सुरु होण्याआधी मेगा लिलाव पार पडला. या लिलावाआधी जुन्या आठ संघाना काही खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली होती. आरसीबीने मॅक्सवेल, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केले. गेल्या अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या चहलला रिलीज करण्यात आले होते. रिटेन करण्याबाबत कोणताही प्रत्साव आला नव्हता, असा खुलासा चहलने केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Floods: 'ही कसली पाहणी?' केंद्रीय पथकाचा अंधारात टॉर्च लावून पाहणीचा फार्स, शेतकरी संतप्त
Mumbai Election : 'निवडणुका जिंकण्यासाठी BJP धर्माचं कार्ड वापरतंय', विरोधकांचा पलटवार
Dhule Elections: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर बॉडीबिल्डर्सना पोलिसांची नोटीस
Farmer Loss : 'सरकार दगाबाज', 31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? Uddhav Thackeray मराठवाड्यात.
Murlidhar Mohal : 'पुण्यातील गुन्हेगारीची पाळंमूळं इथेच आहेत', Ravindra Dhangekar यांचा मोहळ यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget