एक्स्प्लोर
Farmer Loss : 'सरकार दगाबाज', 31 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं? Uddhav Thackeray मराठवाड्यात.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 'सरकारला दगाबाजरे' असं म्हणत, उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटींच्या पॅकेजची मदत मिळाली का, याचा आढावा ते घेणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, सरकारने प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी धुडकावून लावली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात अवघे हजार-बाराशे रुपये जमा करून त्यांची थट्टा केली आहे. नुकसान पाहणीसाठी उशिरा येणाऱ्या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















