Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 18 फेब्रुवारी 2022 : शुक्रवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. भाजप नेते किरीट सोमय्या आज कोर्लई गावाला भेट देणार, शिवसैनिक विरोध करण्याची शक्यता तर काल वर्षावर राऊत-मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये खलबतं
2. अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा, पुतळा उभारण्यास पालिकेच्या आमसभेत मंजुरी
3. ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण, एसी लोकलचे प्रवासी भाडे कमी करण्याबाबत रेल्वे बोर्डाचे प्रयत्न, पंतप्रधान घोषणा करण्याची शक्यता
4. महावितरणच्या 26 कामगार संघटनांचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र, खासगीकरणाच्या बातम्यांबाबत खुलासा करण्याचं आव्हान, विरोध करण्याचा कृती समितीचा इशारा
5. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रसाद पुरोहित यांच्याबरोबर फडणवीसांचं हस्तांदोलन, आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील व्हिडीओ सचिन सावंतांकडून ट्वीट
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 18 फेब्रुवारी 2022 : शुक्रवार
6. ऑनलाइन गेमच्या चक्रव्यूहात अडकल्यामुळं 13 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याचा संशय, मुंबईच्या भोईवाड्यातील घटना, गेममधल्या कॅरेक्टरप्रमाणे तोंडाला अर्धवट रुमाल
Online Game : ऑनलाइन गेमच्या चक्रव्यूहात अडकल्यामुळे मुंबईच्या तेरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेत असताना मुलांकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. चेतन खानोलकर 13 फेब्रुवारीला संध्याकाळी आपल्या तीन वर्षाच्या लहान मुलीला घेऊन पत्नीसोबत फिरायला गेले होते. कारण घरी असलेल्या तेरा वर्षांच्या तीर्थेशला एकट्याने अभ्यास करता यावा. चेतन आपल्या दुचाकीवरून जात असताना सात वाजून 22 मिनिटांनी त्यांचा मोबाईल वाजला. मात्र दुचाकी चालवत असल्यामुळे त्यांनी तो कॉल उचलला नाही आणि तिथेच नियतीने त्यांचा घात केला.
तीर्थेश खानोलकर, हा चेतन खानोलकर यांचा फक्त 13 वर्षांचा मुलगा. आज तो हयात नाही कारण 13 तारखेला संध्याकाळी कोणी घरात नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेत नेहमी पहिला नंबर येणारा तीर्थेश, क्रिकेटमध्ये पण निपुण होता. 14 तारखेला त्याचे अंडर 14 संघातील सिलेक्शन होते. पण त्याआधीच त्याने जीवन संपवले. चेतन यांनी मिस-कॉल पाहून तीर्थेशला अनेक वेळा कॉल केले, मात्र त्याने कॉल उचलला नाही, त्यामुळे ताबडतोब घरी आल्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते कोणालाही विश्वास बसणार नाही असेच चित्र होतं.
7. नवी मुंबई ते मुंबई देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन, एकेरी फेरीसाठी प्रतिप्रवासी 800 ते 1200 रुपये तिकीट, महागड्या तिकीट दरावरुन जनतेची नाराजी
8. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन, वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शिवसेना नेत्यांकडून श्रद्धांजली
9. दुर्मिळ 'ब्लू डायमंड'चा लिलाव होणार, तब्बल 15.10 कॅरेटच्या हिऱ्याला साडेतीनशे कोटींची बोली लागण्याचा अंदाज
10. कोलकातामध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा टी-20 सामना, विजयासह मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला संधी