Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 फेब्रुवारी 2022 : बुधवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. संजय राऊतांच्या आरोपांवर आज सोमय्या दिल्लीत प्रत्युत्तर देणार, सोमय्यांचे निकॉन कंपनी आणि वाधवान यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा राऊतांचा आरोप, अटकेची मागणी
2. राऊतांचा फडणवीसांवर 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, अलिबागमध्ये ठाकरेंचे 19 बंगले असल्याचा दावा करणाऱ्यांना ओपन चॅलेंज, आरोप सिद्ध करण्याचं भाजपचं आव्हान
3. राज ठाकरेंच्या नावापुढे फक्त 'मराठी हृदयसम्राट' हीच उपाधी लावा, हिंदूहृदयसम्राटचे पोस्टर झळकल्यानंतर मनसेचं कार्यकर्त्यांना फर्मान
4. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रचारात दिलेला शब्द खरा करणार असल्याची चर्चा, पुण्याच्या निमगावमध्ये घोडीवर बसून बैलजोडीसमोर बारी मारण्याची शक्यता
5. अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक राहिलेले जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित, कोट्यवधीची माया जमवल्याचा आरोप झाल्यानं विभागीय चौकशी, विनापरवाना परदेशवारी महागात
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 16 फेब्रुवारी 2022 : बुधवार
6. लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू, घात की अपघात? छडा लावण्याचं आव्हान
7. आसामच्या चहाला लाखमोलाचा भाव, 'गोल्डन पर्ल टी'ला 99 हजार 999 रुपये दर, आसाम टी ट्रेडर्सकडून लाखमोलाचा भाव
8. युक्रेनच्या सीमेवरुन रशियानं सैन्य मागे घेतल्यानं तूर्तास सुटकेचा निश्वास, मात्र युद्धाचं संकट कायम, भारतीयांना युक्रेन सोडण्याच्या दूतावासाच्या सूचना
9. बॉलिवूडचे 'गोल्डन सिंगर' बप्पी लहिरी यांचं निधन, वयाच्या 70व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10. आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज टी-20 मालिकेला सुरुवात, एकदिवस सामन्यात व्हाईट वॉश दिल्यानंतर पाहुण्यांना पुन्हा पराभवाची धूळ चारण्याचं आव्हान