एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 मार्च 2021 | रविवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
- १३ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर एनआयएकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक, आज कोर्टात हजर करणार, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी पहिली कारवाई, ठाण्यातून आणखी तीन जणांच्या अटकेची शक्यता
- सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा, महाविकास आघाडीचा चेहरा उघड झाल्याचं म्हणत हल्लाबोल
- पहाटे साडेतीनच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयाबाहेर आलेल्या इनोव्हा कारमुळे चर्चांना उधाण, अंबानींच्या घराबाहेर देखील आढळली होती पांढऱ्या रंगाची इनोव्हा
- लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हा शेवटचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं, नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन
- काल दिवसभरात राज्यात १५,६०२ कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ८८ रुग्णांचा मृत्यू, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची चिंता वाढली
- मुंबई विद्यापीठाचा 2021-22 या वर्षाचा 724 कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प अधिवेशनात सादर
- पुण्यात शिजणार तब्बल सात हजार किलो पुणेरी मिसळ, सुर्यदत्ता-विष्णू महामिसळ 2021 कार्यक्रमात 30 हजार गरजूंना होणार वाटप
- श्रीलंकेत बुरख्याला बंदी, तर एक हजाराहून अधिक मदरशांना टाळं, तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह
- युवराज सिंहचा पुन्हा एकदा सहा षटकारांचा धमाका, इंडियन लिजेंड्सकडून खेळताना दिला जुन्या आठवणींना उजाळा
- पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होणार, दोन संघांसाठी मे महिन्यात लिलाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement