Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 01 मार्च 2022 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. रशिया-युक्रेनमधली चर्चेची पहिली फेरी तोडग्याविनाच आटोपली, कीव्हसह अनेक शहरांत बॉम्बवर्षाव सुरुच, अणुयुद्धाच्या धमकीवरुनही घमासान
2. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका हीच प्राथमिकता, संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारताची भूमिका, युक्रेनला औषध पुरवठ्यासह इतर मदतीचं भारताचं आश्वासन
3. युक्रेनमध्ये अद्यापही 15 ते 16 हजार भारतीय विद्यार्थी अडकून, मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेन शेजारच्या देशात जाणार, अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोठा निर्णय
4. रशियाला फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं, युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियन फुटबॉल टीमला वर्ल्डकप तसेच सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धामधून वगळण्याचा FIFA आणि UEFA चा निर्णय
Football World Cup: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम आता वेगवेगळ्या क्षेत्रात उमटत आहेत. फिफाने रशियाच्या फुटबॉल संघावर कारवाई करत त्यांना वर्ल्डकप मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाच्या फुटबॉल संघाला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधून बाहेर काढण्याचा निर्णय फिफा तसेच UEFA ने घेतला आहे.
UEFA ने ही कारवाई करत या चॅम्पियन लिगची स्पॉन्सर असलेली रशियन कंपनी गॅझप्रोमशी असलाला आपला सर्व करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी फिफा आणि UEFA ने हा निर्णय जाहीर केला आहे. पुढील सूचना येईपर्यंत ही बंदी कायम असेल असं या दोन्ही संघटनांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5. डॉक्टर हे लुटारु आणि मारायच्या लायकीचे, डॉक्टरांबाबत संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, वैद्यकीय संघटना कारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 01 मार्च 2022 : मंगळवार
6. ईडी विरोधात नवाब मलिकांची उच्च न्यायालयात धाव, आज सुनावणीची शक्यता, तर नवाब मलिकांच्या मुलाला ईडीचं समन्स
7. हवामान बदलाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, आयपीसीसीच्या अहवालात धक्कादायक निरीक्षणं, कृषी उत्पन्न घटून पुराचा धोका वाढणार
8. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या रडारवर, नागपुरातल्या राम गणेश गडकरी कारखान्याची 13 कोटी 41 लाखांची संपत्ती जप्त
9. संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, हेमंत नगराळेंची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी, तर मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव
10. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ, प्रमुख ज्योर्तिलिंगाचं एबीपी माझावर दर्शन