एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ अवघी 'ठाकरे सेना' आज नागपुरात! अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार! काय 'बॉम्ब' फुटणार?

ठाकरे गटाची फौज आता नागपुरात दाखल होणार आहे.  उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर उद्या नागपुरात येणार आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार आहे. 

Nagpur Winter Assembly Session Latest News: नागपूरमध्ये (Nagpur News) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Assembly Session) आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर (Uddhav Thackeray, Sanjay Raut, Milind Narvekar) नागपुरात येणार आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार आहे. 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल नवी मुंबईतील (Navi Mumbai) सभेतून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis) तसा सूचक इशारा दिला होता. 'AU' प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray)  घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे फडणवीस सरकारला उत्तर देण्यासाठी रणनिती आखली आहे. संजय राऊतांनी काल बोलताना नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळे आज नागपुरात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात

आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर नागपुरात येणार आहेत, गेल्या आठवड्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. 

 उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॉम्ब फोडणार : संजय राऊत

संजय राऊत काल बोलताना म्हणाले होते की, नागपूरमध्ये उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत.  आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही.  धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार.  आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले, असा आरोप त्यांनी केला होता.   40 आमदार गेले असले तरी आता 140  आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे. ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना सोडायचे नाही.अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार. तुमचे शंभर बाप आले तरी तुम्हाला सोडणार नाही. ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. तुमच्या फायली तयार आहेत. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला दया मया नाही, तुम्ही मागून खंजीर खुपसला, आम्ही पुढून खुपसू, असा इशाराही संजय राऊतांनी दिला होता.

ही बातमी देखील वाचा

उद्धव ठाकरेंसह 'फौज' नागपुरात! 'तुमच्या फायली तयार, उद्या 'बॉम्ब' फोडणार'; संजय राऊतांनी दिला थेट इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget