Aditya Thackeray : पाच तास गायब असलेले मुख्यमंत्री अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जातात, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Lok Sabha Election 2024 : महादेव जानकर यांच्या सभेला गैरहजर असलेले मुख्यमंत्री अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जातात असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून किंवा इंडिया आघाडी म्हणून आम्ही सर्वत्र आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आज घडीला सर्वत्र हे उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहोचून आपला जोरदार प्रचार-प्रसार करत आहेत. मात्र, असे असताना महायुतीतील (Mahayuti) भाजप (BJP) आणि इतर अजून दोन फुटलेले गट अशी गद्दारांची मोठी टोळी त्यांच्यासोबत असूनही त्यांचे उमेदवार अद्याप ठरत नाही. याचा अर्थ त्यांच्यात कुठली तरी बोली लागल्याची शक्यता असेल. त्यामुळे नेमक्या कोणत्या जागा कोणत्या भ्रष्टाचार व्यक्तीला द्यावता याबाबत त्यांच्यात भांडण असल्याची खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena Eknath Shinde) यांच्यावर देखील टीका करत पाच तास गायब असलेले मुख्यमंत्री अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जातात, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून (Yavatmal Lok Sabha Constituency) ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे आज महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्याने आज आदित्य ठाकरे यवतमाळ येथे आले असताना त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री अमावस्या-पौर्णिमेला शेती करायला जातात
माझ्या ऐकण्यात असे देखील आहे की महायुतीमधील मिंदे गटाचे पाच ते सहा उमेदवार देखील बदलले जात आहेत. त्यामुळे या गद्दारांचे भविष्य काय आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशातच आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केला. महाविकास आघाडीतून माढा लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना दिल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी जानकरांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करत आपली हजेरी लावली होती.
मात्र, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्ये पाच तास गायब होते. ते अमावस्या पौर्णिमेला असे गायब होऊन शेती करायला जात असतात. त्यामुळे ते यावेळी देखील आवर्जून शेती करायला गेले असतील. कारण यापूर्वी देखील त्यांनी अशाच पद्धतीने अनेक लोकांना रेंगाळत ठेवले आहे. असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपला देशात स्वतःचे संविधान लागू करायचे आहे
भाजपला देशाचे संविधान आवडत नाही. त्यांना आपल्या स्वतःचे संविधान आवडतं. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवून भाजपला आपले स्वतःचे संविधान देशात लागू करायचे आहे. मात्र,आम्ही असे कदापी करू देणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच अनेक विरोधातील नेत्यांना जॉईन और जेल अशा पद्धतीने धमकवण्यात येत असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी भाजप वर केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या