एक्स्प्लोर
वाहतूक पोलिसाने भर रस्त्यात तरुणाच्या कानशिलात लगावली!

कोल्हापूर : कोल्हापुरात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने भर रस्त्यात एका तरुणाच्या कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिस कर्मचारी संजय पवारने रंकाळा परिसरातील क्रशर चौकात एका वाहनचालकाला अडवून लायसन्स आणि गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्र नसतील तर पैसे द्या, असं तो म्हणाला. यावेळी तरुणाने पैसे घेणाऱ्या संजय पवारचा मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला. ही बाब लक्षात येताच संजय पवारने त्याचा मोबाईल काढन घेत कानशिलात लगावला. यानंतर तरुणानेही पोलिस कर्मचाऱ्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारादरम्यान तिथे जमलेल्या काही तरुणांनी पोलिसाने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ तयार केला. पोलिसाने भर चौकात तरुणाला मारल्याने या परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. वाहनांना शिस्त लावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला आणि संजय पवारसारख्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालणारा तो अधिकारी कोण आहे? असा सवाल या निमित्ताने समोर येत आहे. पाहा व्हिडीओ
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















