(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IAS Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थ आदिवासी विभागात रुजू होणाऱ्या पूजा खेडकरांचा बदली बाबत मोठा ट्विस्ट; नेमकं कारण काय?
पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात करण्यात आली आहे. अकोला येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थ हजर असणार आहे. मात्र या वेळेत आता मोठा बदल करण्यात आला आहे.
Akola News अकोला :प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली होती. मात्र, 11 जुलैला काढण्यात आलेल्या आदेशात आता बदल करण्यात आला आहे. अकोला येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून त्या उद्या, सोमवार 15 जुलै पासून 19 जुलै पर्यंत आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता रुजू होणार होत्या. तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही या आदेशात सांगण्यात आले होते.
मात्र आता त्यात बदल करण्यात आले आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने काढण्यात आलेल्या सुधारित आदेशपत्रात या बाबत बदल करून काही नवीन बदल केले आहे. तर याबाबत उद्या वाशिम जिल्हाधिकारी एस बुवनेश्वरी हे स्वत: या संदर्भात माहिती देणार आहेत. त्यामुळे सध्यातरी पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नव्याने आदेश!
प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून (Pune) थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. दरम्यान, पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली आहे. उद्या, सोमवार 15 जुलै पासून 19 जुलै पर्यंत अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र आता आदेशामध्ये बदल करण्यात आले असून पुढील बदली संदर्भातील माहिती उद्या वाशिम जिल्हाधिकारी एस बुवनेश्वरी हे स्वत: या संदर्भात माहिती देणार आहेत.
पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे पोलिसांची नोटीस
पुणे पोलिसांनी बाणेर रोडवरील घराबाहेर मनोरमा खेडकरच्या नावे नोटीस लावली (IAS officer Pooja Khedkar) आहे. तिचा शस्त्र परवाना रद्द करण्याबद्दल ही नोटीस आहे. पुणे शहर पोलीसांकडून मनोरमा खेडकरला नोटीस बजावत तुमचे पिस्तूलाचे लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये असं या नोटीशीच्या माध्यमातून मनोरमा खेडकरला विचारण्यात आलं आहे. मनोरमा खेडकर विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानं पिस्तूलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मनोरमा खेडकरच्या घरी पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे शहर पोलीसांची पथकं पोहचली. त्यांनी पिस्तूलासंबधीची नोटीस घराबाहेर भिंतीवरती लावली आहे. पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar)ची ऑडी कार ताब्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिस याप्रकरणात आणखी कोणती कारवाई करतात, हे पहावं लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या