एक्स्प्लोर

Manorama Khedkar: पिस्तूल वापराच्या चौकशीसाठी पुणे पोलीस मनोरमा खेडकरांच्या दारावर, पण पोलिसांना अजूनही नो एंट्री

पूजा खेडकरचा आई मनोरमा खेडकरचा हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांवर दमदाटी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयीवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुणे शहर पोलीसांनी मनोरमा खेडकरला नोटीस बजावली आहे.

पुणे: राज्यभरात सध्या चर्चेत असलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे(IAS Pooja Khedkar) आणि तिच्या कुटुंबाचे कारनामे समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असल्याचं दिसून येत आहे. पूजा खेडकरचा आई मनोरमा खेडकरचा दोन दिवसांपुर्वी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांवर दमदाटी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयीवर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्या आईवर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे शहर पोलीसांनी मनोरमा खेडकरला नोटीस बजावली आहे. 

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे पोलिसांची नोटीस

पुणे पोलिसांनी बाणेर रोडवरील घराबाहेर मनोरमा खेडकरच्या नावे नोटीस लावली (IAS officer Pooja Khedkar) आहे. तिचा शस्त्र परवाना रद्द करण्याबद्दल ही नोटीस आहे. पुणे शहर पोलीसांकडून मनोरमा खेडकरला नोटीस बजावत तुमचे पिस्तूलाचे लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये असं या नोटीशीच्या माध्यमातून मनोरमा खेडकरला विचारण्यात आलं आहे. मनोरमा खेडकर विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानं पिस्तूलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मनोरमा खेडकरच्या घरी पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे शहर पोलीसांची पथकं पोहचली. त्यांनी पिस्तूलासंबधीची नोटीस घराबाहेर भिंतीवरती लावली आहे. पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar)ची ऑडी कार ताब्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिस याप्रकरणात आणखी कोणती कारवाई करतात, हे पहावं लागणार आहे.

पूजा खेडकर ऑडी कार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात जमा 

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar) वापरत असलेली ऑडी कार पुणे पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. चतुःश्रृंगी वाहतूक विभागाच्या पोलीस ठाण्याला बॅरिकेटिंग करून ही ऑडी कार ताब्यात घेण्यात आली आहे. पूजा खेडकरने याच ऑडी कारला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला होता. पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला कारसह कारची कागदपत्रे तपासण्यासाठी हजर राहावे अशी नोटीस बजावली होती. तसेच हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे.पूजा खेडकरने दोन दिवसांपूर्वी याऑडी कारचा 27600 रुपये दंड भरला आहे.

पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar) वापरत असलेली ऑडी कार तिच्या कारचालकाने अचानक रात्री पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात नेऊन जमा केली आहे. या कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकरने आयएएस अधिकारी असल्याच दाखवलं होतं. अनेक सरकारी कार्यालयांत जाताना तिने ही कार वापरली होती. मात्र प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा तिला अधिकार नसल्याने पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली. दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरने बंगल्यात प्रवेश दिला नव्हता. मात्र काल रात्री ड्रायव्हरने गाडी पोलीसांकडे सोपवली आहे. या गाडीची कागदपत्रे पोलिसांकडे सोपविण्यात आलेली नाहीत असं पोलिसांच म्हणणं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Murlidhar Mohol Pune: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
Embed widget