एक्स्प्लोर
जालन्यात टोपे कुटुंबियांच्या नावे 99 क्विंटल तूर विक्री
जालना : व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याच्या संशयावरून जालना पोलिसांकडून चौकशी सुरु असताना अनेक बड्या नेत्यांची नाव समोर येऊ लागली आहेत. जालना पोलिसांनी 879 तूर विक्रेत्यांची चौकशी सुरु केली आहे. यात राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या कुटुंबियांच्या नावे देखील तबल 99 क्विंटल तूर नाफेड च्या तूर खरेदी केंद्रवार विकल्याच समोर आलं आहे.
विशेष म्हणजे टोपे कुटुंबियांची 99 क्विंटल तूर एकाच दिवशी म्हणजे 20 मार्च रोजी विकली आहे. राजेश टोपे यांनी जालना APMC मध्ये आपल्या नावावर 40 क्विंटल, पत्नी मनीषा टोपे यांच्या नावे 25 क्विंटल, तर आई शारदा टोपे यांच्या नावावर 34 क्विंटल तूर एकाच दिवशी विकली आहे.
सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी व्हावी या उद्देशाने नाफेडनं 17 मार्च रोजी एका शेतकऱ्याच्या नावे 25 क्विंटल तूर खरेदी करावी अशा स्पष्ट लेखी सूचना केल्या होत्या. मात्र असं असताना देखील राजेश टोपे यांच्या आणि कुटुंबियांच्या नावावर 20 मार्च रोजी 40 क्विंटल आणि त्यांच्या आई शारदा टोपे यांच्या नावावर 34 क्विंटल तूर कशी खरेदी कशी केली असा प्रश्न विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement