एक्स्प्लोर

मराठी साहित्य संमलेन अध्यक्षा अरुणा ढेरेंना डॉ. मुणगेकरांचं खुलं पत्र

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून आपली भूमिका मांडण्याचं आवाहन डॉ. अरुणा ढेरे यांना शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी केलं आहे.

मुंबई : यवतमाळमध्ये आयोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांना अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे विविध स्तरातून पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आपली भूमिका मांडण्याचं आवाहन डॉ. मुणगेकरांनी अरुणा ढेरे यांना केलं आहे. आदरणीय, श्रीमती अरुणाताई ढेरे, सादर प्रणाम. प्रत्येक वर्षी कोणत्या त्या कोणत्या भानगडीत अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या वर्षी आपली बिनविरोध निवड झाली. ही मराठी जणांना सुखावणारी गोष्ट आहे. परंतु यावेळी, साहित्य अकादमी सन्मानपात्र ख्यातनाम साहित्यिका श्रीमती नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण संयोजकांनी अचानक रद्द केले आणि भानगडींची परंपरा सुरु ठेवली. सहगल याचे निमंत्रण रद्द केल्यानंतर मराठी साहित्य-विश्वात निर्माण झालेल्या वादळाची आपल्याला कल्पना आहे. सहगल इंग्रजी भाषिक साहित्यिक आहेत, म्हणून त्या आल्यास संमेलनात गोंधळ घालू, हे कारण सांगून काही  झुंडशाही प्रवृत्तींनी दिलेल्या धमकीमुळे त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. खरे कारण, सेहगल एक संवेदनशील साहित्यिका असल्यामुळे त्या देशातील प्रचलित वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करणार होत्या, हे आहे. आता संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून याबाबत आपली भूमिका महत्वाची आहे. आपल्या साहित्य-सेवेबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा, आणि तो ही बिनविरोध, सन्मान आपल्याला मिळालाच आहे. आता संमेलनाच्या मंचावरुन अध्यक्षीय भाषण करणे, हा एक औपचारिकपणा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडून मराठी साहित्याविषयी जाणिवा घेतलेल्या माझ्या सारख्याला या औपचारिकपणाचे महत्त्व ठावूक आहे. परंतु कोणत्याही कारणामुळे, प्रचलित परिस्थितीत आपण संमेलनास उपस्थित राहून अध्यक्षीय भाष्य केल्यास कणाहीन संयोजकांप्रमाणेच आपणही असहिष्णुता आणि झुंडशाहीसमोर शरण गेल्यासारखे होईल. भारतातील उदारमतवादाचे जनक असलेल्या युगपुरुष न्या. रानडे यांच्या विचारविश्वाशी ती प्रतारणा ठरेल. आपल्या सद्सदविवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे. आपला, डॉ. भालचंद्र मुणगेकर 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Speech Dapoli | राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम महायुतीने केलं-आदित्य ठाकरेTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Bag Checking : उद्धव ठाकरेनंतर आदित्य ठाकरे यांच्याही बॅगांची तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगेवरुन पंकजा मुंडेंचा घुमजाव
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगेवरुन पंकजा मुंडेंचा घुमजाव
Kolhapur Uttar Vidhan Sabha :  बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
Embed widget