एक्स्प्लोर
90 व्या मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 90 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मंत्रालयात एका छोटेखानी समारंभात झाले. डोंबिवलीचे आगरी युथ फोरम हे या संमेलनाचे आयोजक असून बंदरे, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे, महामंडळाच्या सदस्या उषा तांबे, उज्ज्वला मेहंदळे, साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी, डोंबिवलीच्या मराठी साहित्य परिषदेचे सुरेश देशपांडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फोटो : डोंबिवलीतील नियोजित 90 व्या मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. या बोधचिन्हामध्ये डोंबिवलीतील सांस्कृतिक स्थळे व प्रतिके यांचा वापर करण्यात आला असून यामध्ये डोंबिवलीतील गणपती मंदिराचा कळस तसेच सरस्वती व लेखणी, ग्रंथ यांचाही समावेश त्यात आहे. ठाणे जिल्ह्याची ओळख असलेल्या वारली चित्रकलेने या बोधचिन्हाचे महत्त्व आणखीनच वाढविले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement