एक्स्प्लोर
Advertisement
स्त्री भ्रूण हत्यांवरुन गाजलेल्या बीडमध्ये एकाच मांडवाखाली तब्बल 802 मुलींचे नामकरण
स्त्री भ्रूण हत्याप्रकरणी गाजलेल्या बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.
बीड : जन्मलेल्या बाळाचं नामकरण करण्याचा सोहळा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात होत आसतो. बीडमध्ये मात्र हा नामकरण सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतोय. एकाच मांडावाखाली तब्बल 802 मुलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मुलींच्या जन्माचे स्वागत केल्याने जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुलीचे व मुलाचे स्वागत शहरी व ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होते हे नाकारता येणार नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे खास पद्धतीने स्वागत करण्यात आलं आहे. भव्य सभामंडप, एकाचवेळी तब्बल 301 पाळण्यात बसवलेल्या चिमुकल्या, व्यासपीठावरुन गायिली जाणारी बारशाची गीतं आणि तुडूंब भरलेल्या सभामंडपात नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई, असं कार्यक्रमाचं स्वरुप आहे. बीड शहरातील कीर्तन महोत्सवात सामूहिक बारश्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. दिवंगत झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलींच्या जन्मदरात जिल्ह्याची भरारी -
एकेकाळी ज्या बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हा राज्यात सगळ्यात कमी होता, आता मात्र मुलीला जन्म देणाऱ्या माता फेटा घालून मिरवत आहेत. बीड जिल्हा आता राज्यातील मुलींच्या जन्मदरामध्ये सन्मानजनक जिल्ह्यांमध्ये जाऊन बसला आहे. आजमितीला बीड जिल्ह्यात 1000 मुलांमागे तब्बल 961 मुली आहेत.
स्त्री भ्रूण हत्याप्रकरणी बीड प्रकाशझोतात -
स्त्री भ्रूण हत्याप्रकरणी बीड जिल्हा प्रकाशझोतात आला होता. परळी येथे डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात अवैध गर्भपात, गर्भलिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन एका सामाजिक संस्थेने बनावट रुग्ण पाठवून यातील सत्य समोर आणलं. हे स्टिंग जाहीर झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी डॉ. सरवस्ती मुंडे, मृत विजयमाला पटेकर यांचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवत 10 वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी ठोठावली. या प्रकरणी एकूण 17 आरोपी होते. त्यातील चारजण मृत झाले असून, उर्वरित 10 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
संबंधित बातमी - बीडने स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसला, मुलींच्या जन्मदरात भरारी
VIDEO | पोटच्या मुलीची हत्या करुन महिलेची आत्महत्या | ठाणे | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ट्रेडिंग न्यूज
शिक्षण
व्यापार-उद्योग
Advertisement