एक्स्प्लोर
हिंगोलीत नियमबाह्य 6 लाख रुपये बदलले, कॅशिअर निलंबित
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधून बेकायदेशीरपणे 6 लाख रुपये बदलून दिल्याचं उघड झालं आहे. कुठलेही कागदपत्र न घेता ही रक्कम बदलून देण्यात आली. या प्रकरणी कॅशिअर बापुराव गुहाडे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
गुहाडे यांनी सहा लाख रुपये रकमेच्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांच्या बदल्यात 6 लाख रुपये बदलून दिले.
यापूर्वी देखील लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 19 लाख रुपये बेकायदेशीरपणे बदलून दिल्याचं उघड झालं होतं. याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं होतं.
दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नोटाबंदीनंतर 24 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये सध्या जुन्या पाचशे, हजारच्या नोटा केवळ जमा केल्या जात आहेत. या नोटा बदलून दिल्या जात नाहीत. असं असतानाही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हा प्रकार घडला.
नियमबाह्य 19 लाख बदलले, 4 बँक कर्मचारी निलंबित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement