एक्स्प्लोर

6 January Headlines : मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, सिंधुदुर्गात अन्नत्याग आंदोलन; आज दिवसभरात

6 January Headlines : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याशिवाय संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

6 January Headlines : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याशिवाय संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्राणांगणात माणदेशी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. तर मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवरक राजू पेडणेकरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर  मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यासह दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घटना आहेत,, त्यासंदर्भात जाणून घेऊयात... 

संजय राऊत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
नाशिक – शिवसेना खासदार संजय राऊत आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. उध्दव ठाकरे नशिकमध्ये सभा घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राऊताचा दौरा महत्वाचा आहे. ठाकरे गटाला सुरुंग लागल्यानंतर डॅमजे कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे मैदानात असून संजय राऊत मैदान तयार करण्यासाठी येत आहेत. संपर्क प्रमुख, माजी आमदार, 12 नगरसेवक पदाधिकारी यांनी मागील 15 दिवसात पक्ष्याला जय महाराष्ट्र केलाय. 

मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पाहूयात कसा असेल त्यांचा दौरा
कोल्हापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. 
सातारा – महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा शाकंभरी पोर्णिमेला भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या यात्रेसाठी जाण्याची शक्यता आहे.  त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या दरे गावी जाणार आहेत.  

माणदेशी महोत्सवाला सुरुवात -
मुंबई – प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्राणांगणात माणदेशी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पुढचे 4 दिवस हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाला मुंबईकरांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत असतो. मुंबईकर माणदेशी खाद्यपदार्थांची चव चाखण्याकरता आवर्जून या महोत्सवाला भेट देत असतात त्याचसोबत या महोत्सवामध्ये अनेक कलाकार आपली कला सादर करत असतात. महिलांचं सबलीकरण आणि सशक्ति करणाच्या संदर्भातलं हे पुढचं पाऊल उचलण्यात आलंय असं देखील या महोत्सवाला म्हटलं जातं.  
 
कोचर दांपत्यांच्या सुटकेच्या मागणीवर सुनावणी -
कोचर दांपत्यानं सीबीआयच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान देत जेलमधून तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनी सीबीआयनं केलेल्या अटकेच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) मंगळवारी हायकोर्टाकडे वेळ मागितला होता. सीबीआयतर्फे जेष्ठ वकील राजा ठाकरे यांनी ही विनंती केली, त्यावर आज सुनावणी होणार आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर संदर्भात सुनावणी -
जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर बंदी घालण्यास दोन वर्ष का लागली?, असा सवाल करत हायकोर्टानं राज्य सरकारकडनं स्पष्टीकरण मागितलं आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा बेबी पावडरचे नमूने घेतले होते तर मग कारवाईसाठी सप्टेंबर 2022 पर्यंत कसली वाट पाहत होतात?, या शब्दांत हायकोर्टानं गेल्या सुनावणीत राज्य सरकारची कानउघडणी केली होती. याशिवाय साल 2021 मध्ये केंद्र सरकारनं एफडीए करता नवी नियमावली तयार केलेली आहे. त्यामुळे त्याआधीच्या नमुन्यांवरील चाचणीच्या आधारे दिलेले कारवाईचे आदेश थेट रद्द होतात. जर तुम्हाला हवं तर नव्या नियमावलीनुसार नमुने घेत पुन्हा चाचणी करू शकता, मात्र हे आदेश लागू राहणार नाहीत असं हायकोर्टानं राज्य सरकारला यावर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत आज यावर निर्देश जारी करणार असल्याचं स्पष्ट केलं होत.

पुतीन यांच्याकडून युक्रेनलाही युद्धविरामाचं आवाहन-
व्लादिमिर पुतीन यांचे रशियन सैनिकांना ६ ते ७ जानेवारी दरम्यान युक्रेनमध्ये युद्धविरामाचे आदेश...पुतीन यांच्याकडून युक्रेनलाही युद्धविरामाचं आवाहन. ऑर्थोडॉक्स ख्रिसमस साजरा करण्यासाठी पुतीन यांचे आदेश
 
समलैंगिक विवाहाच्या मुद्यावर सुनावणी -
दिल्ली – समलैंगिक विवाहांच्या मुद्यावर केंद्र सरकारने दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आज सुनावणी स्थगित करावी अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील उपलब्ध नसल्याने दोन आठवड्यांचा वेळ आणखी मिळावा ही विनंती कोर्टाला केली गेली आहे. यावर आज सुनावणीची शक्यता आहे. 
 
अजित पवार यांचा पुणे दौरा -
पुणे – विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे पुणे शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत केलं जाणार आहे, सकाळी 9 वाजता. अजित पवारांच्या उपस्थित बारामती हॉस्टेल येथे बैठक होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचे की धर्मवीर म्हणायचे यावरून सुरु झालेल्या वादाच्य पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे स्वागत केलं जाणार आहे. 

ठाकरे कुटुंब आज सकाळी मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या इथे येणार आहेत.  

मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेविरोधात याचिका -
मुंबई – मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवरक राजू पेडणेकरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर  मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 
 
मुंबई – अमृता फडणवीस यांच्या 'मुड बना लेया' या गाण्याचं लॉचिंग होणार आहे. दुपारी 12.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 
 
मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ज्वेलरी ब्रॅण्डचं उद्घाटन राज ठाकरे आणि विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

जागतिक मराठी अकादमी संमेलनाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत, संध्याकाळी 5 वाजता, डी वाय पाटील महाविद्यालय.

यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा सकाळी 9 वाजता, किल्ले वाफगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी, आमदार, खासदार त्याचबरोबर ऐतिहासिक घराण्यातील वंशज उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 वाजता भूषणसिंहराजे होळकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. 

बारामती – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज श्री सोमेश्वर कारखान्याच्या शिक्षण संस्थेला देणार भेट आहेत. यावेळी शरद पवार महाविद्यालयातील विद्यार्थी याच्यांशी संवाद साधणार आहेत, सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजता.  

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार आहे.  हा मोर्चा सकाळी 11 वाजता निघणार आहे.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दुपारी 3 वाजता कोल्हापुरात येणार आहेत.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा -
सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा 12 जानेवारीपासून उत्साहात साजरी होणार आहे. दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मर्यादित लोकांच्या उपस्थितीमध्ये करावी लागली. यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्याने यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक देखील मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित असतात. यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात तयारी कशी सुरु आहे. 

अन्नत्याग आंदोलन -
सिंधुदुर्ग – ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजी, देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तर राज्यातील एकमेव शिवराजेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने शिवप्रेमी, पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कामांना गती मिळत नसल्याने येत्या महिनाभरात या कामांना सुरूवात न झाल्यास अन्नत्याग आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाश्यांनी दिला आहे.
 
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघाती मृत्यूच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केलेली असतांनाच आता एक धक्कादायक माहिती समोर आलीये. उत्तर महाराष्ट्रात 2022 साली 2 हजार 700 प्राणघातक अपघात झाले असून यातील 20 टक्के केसेस या हिट अँड रनच्या आहेत. अपघातांवर आळा बसवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करून फरार आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या 5 जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
अहमदनगर – कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धा आणि शारदाबाई पवार सभागृह उद्घाटन समारंभ, सकाळी 9 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित रहाणार आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभ -
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व्हिडीओ कंन्फरंसिंग द्वारे (ऑनलाइन) उपस्थित रहाणार आहेत. पद्मविभूषण अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित रहाणार आहेत. नवी दिल्ली येथील कृषी शास्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.चारूदत्त मायी आणि आदर्श गाव संकल्प तथा प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित करण्यात येणार आहे. मंडप डीलर्स अधिवेशनाला मंत्री उदय सामंत आणि अशोक चव्हाण उपस्थित रहाणार आहेत.
 
बीड – उत्सव असो की आपत्ती.. सण असो की दुःखद घटना या सगळ्या काळात पोलीस मात्र आपल कर्तव्य कायम पार पाडत असतात. पण याच पोलिसांच्या आरोग्यापासून कौटुंबिक नियोजनापर्यंत सारच गणित बिघडलेलं असतं म्हणूनच बीड जिल्ह्यातील 2300 पोलीस कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यापासून कौटुंबिक आर्थिक नियोजनापर्यंत उजळणी कोर्सचे नियोजन करण्यात आहे. सध्या पहिली बॅच 30 पोलिसांची आहे.
 
हिंगोली – जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालय. धुक्याची चादर जिल्ह्यात सर्वदूर पसरलय. या वातावरणाच्या बदलाचा फटका शेतातील पिकांना बसतोय. हरभरा, तूर, गहू यासह आंब्याच्या फळबागांना सुद्धा वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
भंडारा – मागील दोन दिवसांपासून तापमानात घट झालीये. अशात कुडकुडत्या थंडीत पोलीस विभागाची भरती प्रक्रिया सुरू आहे. आज वाहन चालक पदासाठी एक्सआर्मी मॅन आणि महिलांची शारीरिक चाचणी होणार आहे.
 
अमरावती – महाराष्ट्र पोलीस दलाचा पोलीस वर्धापन 2 जानेवारीला साजरा झाला. रेझींग डे निमित्त अमरावती पोलीस आयुक्तालया मार्फत 6 आणि 7 जानेवारपासून पोलीस मुख्यालय कवायत मैदानात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी पोलीसांच्या शस्त्राचे प्रदर्शन खुल केलं जाणार आहे.
 
आता भारतात मिळणार, परदेशातलं उच्च शिक्षण ! 
मुंबई – आता भारतात मिळणार, परदेशातलं उच्च शिक्षण ! परदेशातील उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठ आपले कॅम्पस भारतात सुरू करून देशभरातील विद्यार्थ्यांना मायदेशातच शिक्षण देऊ शकणार, युजीसीने या संदर्भात आज रेग्युलेशन ट्राफ्ट तयार करून नियम जारी केले आहेत. या युजीसीच्या निर्णयामुळे फॉरेन युनिव्हर्सिटीचा शिक्षण फॉरेन युनिव्हर्सिटी कॅम्पस भारतात सुरू करण्यास मंजुरी दिल्याने हे शिक्षण भारतात सुद्धा घेता येईल. मात्र हेच कॅम्पस सुरू करत असताना परदेशातील विद्यापीठांना ऑनलाइन किंवा डिस्टन्स कोर्स सुरू करता येणार नाहीत. कॅम्पस सुरू करताना 10 वर्षांची मंजुरी विद्यापीठाला युजीसीकडून देण्यात येईल. सोबतच कोर्स आणि फी संदर्भात निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार या विद्यापीठ कॅम्पससाठी भारतात अभ्यासक्रम सुरू करताना असेल. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVEMitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानातDevendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीसSadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत मविआचे डुक्कर, कितीही साबण लावला तरी घाणीत जातं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Embed widget