एक्स्प्लोर
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर जीप आणि कंटनेरच्या भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहे. पांढरीपुलाच्या घाटात रात्री नऊच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.
अपघातात मृत झालेले सर्वजण घोडेगावचे रहिवासी असून एकाच कुटुंबातील आहेत. हे सगळेजण अहमदनगरहून रा जीपने घोडेगावला जात होते. त्याचवेळी औरंगाबादकडून नगरकडे येणाऱ्या कंटेनरचा आणि जीपची टक्कर झाली. दरम्यान, जखमींवर नगरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घाटातील तीव्र चढ-उतार आणि भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांमुळे इथे नेहमीच अपघात होतात. मात्र सुरक्षेचे कोणतेच उपाययोजना राबवल्या जात नसल्याने अपघात वाढू लागले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement