एक्स्प्लोर

3rd April Headlines : राहुल गांधी वरच्या न्यायालयात दाद मागणार, आजपासून तहसिलदार-नायब तहसिलदार संपावर जाणार; आज दिवसभरात

अभिनेता नवाझउद्दीन सिद्दिकी कौटुंबिक कलह प्रकरणी हायकोर्टात विशेष सुनावणी. नवाझउद्दीन सिद्दीकी आणि कुटुंबियांना आज हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश.

मुंबई: सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात आज काँग्रेस नेते राहुल गांधी वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत. तर ज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहे. आज संसदेच्या शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस असणार आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,

सुरत न्यायालयाच्या निकालाविरोधात राहुल गांधी याचिका दाखल करणार

सुरत कोर्टाने राहुल गांधीच्या 2019 च्या वक्तव्यासंदर्भात दिलेल्या निकाला विरोधात राहुल गांधी आज याचिका दाखल करणार आहेत. सुरत न्यायालयाने 23 मार्चला राहुल गांधींना दोषी ठरवलं होतं. आज याचिका करताना राहुल गांधी उपस्थित रहाणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधींना आयपीसी कलम 499 (मानहानी) आणि कलम 500 (एखाद्या व्यक्तीची मानहानी फौसदारी खटला) नुसार दोषी ठरवलं होतं. त्याच दिवशी राहुल गांधींना जामीन मिळाला होता आणि शिक्षेच्या अमलबजावणीसाठी 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती.  न्यायालयाच्या निर्णया विरोधात वरच्या कोर्टात जाता यावं यासाठी हा वेळ दिला जातो.

तहसिलदार आणि नायब तहसिलदार आजपासून संपावर

आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहे. राजपत्रित वर्ग – 2 नायब तहसिलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मूळे पदाच्या अस्तित्वाच्या न्याय मागणीसाठी रुपये 4300 वरुन 4800 रुपये करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. 

संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होतोय. राहुल गांधी आणि आदानी मुद्यावरून संसदेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज होऊ शकले नाही. 13 मार्चापासून सुरू झालेला हा टप्प्याचं कामकाज 6 मार्च पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातून जनतेला काय मिळालं? (सकाळी 9.30 वाजता प्रशांत कदम लाईव्ह)

कोर्टातल्या महत्वाच्या सुनावणी

मंत्रालयातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर हल्ला केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील आजच्या सुनावणीत बच्चू यांच्यावर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडण्याची शक्याता आहे.

अभिनेता नवाझउद्दीन सिद्दिकी कौटुंबिक कलह प्रकरणी हायकोर्टात विशेष सुनावणी. नवाझउद्दीन सिद्दीकी आणि कुटुंबियांना आज हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश. नवाझ त्याची पत्नी झैनब, दोन्ही मुलं आणि भाऊ शमशुद्दीनला कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या न्यायदालनात दुपारा 4:30 वाजता सुनावणी.

पंतप्रधान मोदी आज CBI च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजता विज्ञान भवनात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि CBI च्या सर्वोत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांसाठी सुवर्णपदक प्राप्तकर्त्यांसाठी एक अन्वेषण समारंभ आयोजित केला जाईल. या समारंभात पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांना पदके प्रदान करतील. शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे सीबीआयच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयीन संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. सीबीआयच्या हीरक महोत्सवी वर्षात ते टपाल तिकीट आणि स्मरणार्थी नाणे जारी करतील. ते सीबीआयचे ट्विटर हँडलही लॉन्च करणार आहेत. CBI ची स्थापना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या 1 एप्रिल 1963 च्या ठरावाद्वारे करण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नऊ वर्षांनी लहान अमेरिकेच्या जॅकलिनला आंध्रच्या चंदनचा साधेपणा भोवला, इन्स्टाग्रामवरचे प्रेम देशांच्या सीमा ओलांडून भारतात
नऊ वर्षांनी लहान अमेरिकेच्या जॅकलिनला आंध्रच्या चंदनचा साधेपणा भोवला, इन्स्टाग्रामवरचे प्रेम देशांच्या सीमा ओलांडून भारतात
लोकांच्या कामात हयगय खपवून घेणार नाही, कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आदेश 
लोकांच्या कामात हयगय खपवून घेणार नाही, कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आदेश 
सर्वच राष्ट्रांच्या नेत्यांचा व्यापारी करारासाठी संपर्क, माझ्या #@$& चा मुका घेताहेत, ट्रम्प यांची जीभ घसरली
नेते माझ्या #@$& चा मुका घेताहेत, ट्रम्प यांची जीभ घसरली, जितेंद्र आव्हाडांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा किस्सा सांगितला
UPI : गुड न्यूज, आरबीआयचा मोठा निर्णय, यूपीआयद्वारे P2M व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास ग्रीन सिग्नल
गुड न्यूज, आरबीआयचा मोठा निर्णय, यूपीआयद्वारे P2M व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास ग्रीन सिग्नल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 10 April 2025ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 09 April 2025Mumbai Chembur Firing :  मुंबईतील चेंबूर परिसरात गोळीबार, व्यावसायिक सद्रुद्दीन खान जखमीTuljapur Drugs Case :  कशी झाली तुळजापुरात ड्रग्जची एन्ट्री? तस्करांवर राजकीय वरदहस्त Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नऊ वर्षांनी लहान अमेरिकेच्या जॅकलिनला आंध्रच्या चंदनचा साधेपणा भोवला, इन्स्टाग्रामवरचे प्रेम देशांच्या सीमा ओलांडून भारतात
नऊ वर्षांनी लहान अमेरिकेच्या जॅकलिनला आंध्रच्या चंदनचा साधेपणा भोवला, इन्स्टाग्रामवरचे प्रेम देशांच्या सीमा ओलांडून भारतात
लोकांच्या कामात हयगय खपवून घेणार नाही, कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आदेश 
लोकांच्या कामात हयगय खपवून घेणार नाही, कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आदेश 
सर्वच राष्ट्रांच्या नेत्यांचा व्यापारी करारासाठी संपर्क, माझ्या #@$& चा मुका घेताहेत, ट्रम्प यांची जीभ घसरली
नेते माझ्या #@$& चा मुका घेताहेत, ट्रम्प यांची जीभ घसरली, जितेंद्र आव्हाडांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा किस्सा सांगितला
UPI : गुड न्यूज, आरबीआयचा मोठा निर्णय, यूपीआयद्वारे P2M व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास ग्रीन सिग्नल
गुड न्यूज, आरबीआयचा मोठा निर्णय, यूपीआयद्वारे P2M व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास ग्रीन सिग्नल
Beed: शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी नदीचा नाला केला, कागदपत्रे रंगवली; परळी नगरपरिषदेचा आणखी एक प्रताप
शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी नदीचा नाला केला, कागदपत्रे रंगवली; परळी नगरपरिषदेचा आणखी एक प्रताप
Chhaava Box Office Collection: 'छावा' जोमात, बाकी सारे कोमात; विक्की कौशल बॉक्स ऑफिसवर हिट, किंग खानच्या 'जवान'लाही पछाडलं
'छावा' जोमात, बाकी सारे कोमात; विक्की कौशल बॉक्स ऑफिसवर हिट, किंग खानच्या 'जवान'लाही पछाडलं
Mumbai:  केंद्र सरकारविरोधात उबाठा आक्रमक,  तिरडी यात्रा काढत विक्रोळीत जोरदार घोषणाबाजी Photos
केंद्र सरकारविरोधात उबाठा आक्रमक, तिरडी यात्रा काढत विक्रोळीत जोरदार घोषणाबाजी Photos
'कोंबडी चोर' बिबट्या पोल्ट्रीत शिरला, कोंबड्यांचा फडशाही पाडला, पण लाईट गेल्याने पंचायत झाली; शेतकऱ्याच्या लक्षाच येताच... Viral Video
'कोंबडी चोर' बिबट्या पोल्ट्रीत शिरला, कोंबड्यांचा फडशाही पाडला, पण लाईट गेल्याने पंचायत झाली; शेतकऱ्याच्या लक्षाच येताच... Viral Video
Embed widget