एक्स्प्लोर

Shivrajyabhishek Din 2023 LIVE : आज शिवराज्याभिषेक दिन... राज्यभरात विविध कार्यक्रम

Shivrajyabhishek Din 2023 : आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले.

Key Events
350th Shivrajyabhishek Din 2023 of Chhatrapati Shivaji Maharaj 6th June Shivray coronation 350th anniversary today live updates marathi news 06 June 2023 Shivrajyabhishek Din 2023 LIVE : आज शिवराज्याभिषेक दिन... राज्यभरात विविध कार्यक्रम
Shivrajyabhishek Din 2023 LIVE : आज शिवराज्याभिषेक दिन... राज्यभरात विविध कार्यक्रम
Source : Raigad

Background

Shivrajyabhishek Din 2023 : आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर (Raigad Fort) न भूतो न भविष्यति असा झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती. आज 6 जून रोजी तारखेनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा 2 जून रोजी तिथीनुसार आणि 6 जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेकाला 349 वर्षे पूर्ण होऊन 350 वं वर्ष सुरु होत आहे.

आज तारखेनुसार साजरा होतोय शिवराज्याभिषेक सोहळा

शिवरायांच्या स्वराज्याच्या ध्येयासाठी सुरू झालेल्या लढ्यातला आजच्या दिवशी मोठा टप्पा पार पडला. शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला आणि रयतेचे लाडके शिवबा छत्रपती झाले आणि रयतेला वाली मिळाला. भारताच्यd इतिहासातील हा फार मोठा दिवस आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सर्वदूर पसरली असल्यामुळे, देशासह विदेशातही आज शिवराज्यभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. 

सार्वभौम राज्याची स्थापना

'मराठ्यांचे बंड' नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या शिवराज्याभिषेकामुळे दिसून आलं. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारलं

महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला. यामुळे गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मनातील आग स्वराज्याच्या प्रेरणेनं ज्वलंत झाली. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले. 

12:20 PM (IST)  •  06 Jun 2023

 Nanded News:  शिवराज्याभिषेक सोहळा आज नांदेड जिल्हा परिषदेत साजरा

 Nanded News:  शिवराज्याभिषेक सोहळा आज नांदेड जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर प्रमुख पाहुणे खा. प्रताप पाटील चिखलीकर आमदार राम पाटील रातोलीकर उपस्थित होते

12:19 PM (IST)  •  06 Jun 2023

Beed News: आष्टी शहरात पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

Beed News:  बीड जिल्ह्यातील आष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला.ढोल ताशा गजरात हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी हजारो शिवभक्त उपस्थित होते

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget